News Flash

‘या’ मराठमोळ्या अभिनेत्रीला ओळखलं का? बॉलिवूडमध्येही आहे दबदबा

तुम्ही ओळखलं का या मराठमोळ्या अभिनेत्रीला?

वयाने कितीही मोठे झालो तरीदेखील बालपणीच्या आठवणीत रमायला आजही अनेकांना आवडतं. यात सेलिब्रिटीदेखील अपवाद नाहीत. अनेक सेलिब्रिटी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्या बालपणीच्या आठवणींना उजाळा देत असतात. अनेकदा ही कलाकार मंडळी त्यांचे लहानपणीचे फोटो, व्हिडीओ शेअर करत असतात. यात सध्या चर्चा रंगली आहे एका मराठमोळ्या अभिनेत्रीची.

मराठीबरोबरच हिंदी चित्रपटसृष्टीतही आपल्या नावाचा डंका वाजवणारी अभिनेत्री म्हणजे पूजा सावंत. कलाविश्वाप्रमाणेच पूजा सोशल मीडियावरही सक्रीय असते. त्यामुळे अनेकदा ती तिच्या फोटोशूटचे किंवा चित्रपटांचे फोटो, पोस्टर शेअर करत असते. यात अलिकडेच तिने तिच्या लहानपणीचा एक फोटो शेअर केला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Pooja Sawant (@iampoojasawant)

पूजाने शेअर केलेल्या फोटोमध्ये ती तिच्या आई-वडिलांसोबत असल्याचं दिसून येत आहे. यात तिने बालपणीचा आणि सध्याच्या घडीचा असे दोन फोटो शेअर केले आहेत. सोबतच वेळ किती पटकन निघून जातो, अशा आशयाचं कॅप्शन दिलं आहे.

दरम्यान, पूजा सावंत मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे. ‘दगडी चाळ’, ‘निळकंठ मास्त’र, ‘क्षणभर विश्रांती’, ‘पोस्टर बॉइज’, ‘विजेता’ अशा गाजलेल्या मराठी चित्रपटात झळकली आहे. तर, अभिनेता विद्युत जामवालसोबत तिने ‘जंगली’ या बॉलिवूड चित्रपटातही काम केलं आहे. या चित्रपटात तिने शंकरा ही भूमिका साकारली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 10, 2021 3:26 pm

Web Title: marathi actress pooja sawant share her childhood photo ssj 93
Next Stories
1 धनश्री वर्मा आणि श्रेयस अय्यरचा डान्स व्हिडीओ व्हायरल
2 ‘अ मॅरिड वूमन’चा टीझर प्रदर्शित; पाहा व्हिडीओ
3 स्वप्नपूर्ती! निक-प्रियांकाच्या गृहप्रवेशाचे कधीही न पाहिलेले फोटो
Just Now!
X