News Flash

रेड झोनमध्ये असूनही प्राजक्ता माळी लुटतेय ग्रीन झोनचा आनंद

लॉकडाउन काळात चाहत्यांना दिला मोलाचा सल्ला

प्राजक्ता माळी

संपूर्ण देशभरता अजुनही करोना विषाणूचा धुमाकूळ सुरु आहे. महाराष्ट्रात मुंबई, पुणे या महत्वाच्या शहरांना करोनाचा विळखा बसलेला आहे. अनेक रुग्णांना करोनामुळे आपले प्राणही गमवावे लागले आहेत. पुणे शहरातील बहुतांश भाग हा रेड झोन म्हणून घोषित करण्यात आला आहे. सध्याच्या लॉकडाउन काळात अनेक सेलिब्रेटी, खेळाडू घरात राहून आपल्या परिवारासोबत वेळ घालवत आहेत.

मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळीही आपल्या पुण्यातील घरात आहे. मात्र रेड झोनमध्ये असल्याचा प्राजक्ताला जरासाही त्रास होत नाहीये. आपल्या घरातील अंगणासमोर असलेल्या बागेत निसर्गाच्या सानिध्यात प्राजक्ता चटई घालून वेळ घालवते आहे. आपल्या परिवारासोबत वेळ घालवतानाचे काही फोटो प्राजक्ताने आपल्या फेसबूक अकाऊंटवर पोस्ट केले आहेत.

लॉकडाउन काळात प्राजक्ता घरात राहून विविध उपक्रमात आपलं मन रमवत आहे. काही दिवसांपूर्वी तिने आईकडून स्वयंपाकाचे खास धडे घेत जेवण बनवतानाचा व्हिडीओ पोस्ट केला होता. यासोबत बागेत आईला मदत करण्यापासून ते वाचन या माध्यमातून प्राजक्ता वेळ घालवते आहे. काही दिवसांपूर्वी प्राजक्ताने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन चाहत्यांसाठी योगविद्येचं मार्गदर्शन आणि आहारासंदर्भातल्या काही टिप्स दिल्या होत्या.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 6, 2020 2:20 pm

Web Title: marathi actress prajakta mali enjoying her quarantine period in pune psd 91
Next Stories
1 फोटोतील तिसरा हात कोणाचा? किम कार्दशियनला नेटकऱ्यांचा प्रश्न
2 एक हात मदतीचा! आशुतोष गोखले गरजूंमध्ये करतोय फूड पॅकेट्सचं वाटप
3 “एक नव्हे तर चार बॉयफ्रेंड हवेत”; टायगर श्रॉफच्या कथित प्रेयसीचा व्हिडीओ व्हायरल
Just Now!
X