News Flash

अपघातातून बचावल्यानंतर प्रार्थना काय म्हणतेय पाहिलं ?

लोणावळ्याच्याच रस्त्यावर असतेवेळी एका टेम्पोला ही कार धडकली आणि हा अपघात झाला होता. अपघात झालेल्या कारचे फोटो पाहिले असता त्याची भीषणता लगेचच लक्षात येत आहे.

छाया सौजन्य- इन्स्टाग्राम

‘मस्का’ या आगामी चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी म्हणून कोल्हापूरच्या दिशेने निघालेल्या अभिनेत्री प्रार्थना बेहेरे आणि अभिनेता अनिकेत विश्वासराव यांच्या कारला अपघात झाला. अतिशय भीषण अशा या अपघातामध्ये फार हानी झाली नसली तरीही कारचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. तर प्रार्थनाच्या एका हातालाही दुखापत झाली आहे.

अपघात झाला त्यावेळी कारमध्ये अनिकेत, प्रार्थना, प्रार्थनाची असिस्टंट आणि चालक असे चौघेजण उपस्थित होते. माध्यमांमध्ये या कलाकार जोडीच्या अपघाताचं वृत्त वाऱ्यासारखं पसरताच चाहत्यांच्या वर्तुळातून त्यांच्याप्रती चिंता व्यक्त करण्यात आली. अनेकांनी प्रार्थना आणि अनिकेत यांच्या प्रकृतीविषयी जाणून घेण्यासाठी शक्य त्या सर्व मार्गांचा वापर केला. आपल्याप्रती चाहत्यांचं आणि संपर्कात असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचं प्रेम पाहता प्रार्थनाने त्या सर्वांचेच आभार मानले आहेत.

सोशल मीडियावर तिने एक फोटो पोस्ट करत त्यासोबतच कॅप्शनही लिहिलं आहे. ज्यामध्ये तिने आपली प्रकृती आता उत्तम असल्याचं स्पष्ट केलं आहे. त्यासोबतच नशिबाच्या या खेळीनंतर आता आपण अधिकच भाग्यवान असल्याची भावना तिने या पोस्टच्या माध्यमातून व्यक्त केली आहे. प्रार्थनाने या पोस्टच्या माध्यमातून चाहत्यांचे सहृदय आभार मानल्यानंतर चाहत्यांनीसुद्धा तिच्या या पोस्टवर व्यक्त होण्यास सुरुवात केली.

वाचा : माधुरी… मराठी मनाचा सांस्कृतिक अभिमान

लोणावळ्याच्याच रस्त्यावर असतेवेळी एका टेम्पोला ही कार धडकली आणि हा अपघात झाला होता. अपघात झालेल्या कारचे फोटो पाहिले असता त्याची भीषणता लगेचच लक्षात येत आहे. एका बाजुला दरी असल्यामुळे हा अपघात अतिशय भीषण असल्याचं अनिकेतने माध्यमांशी संवाद साधताना सांगितलं होतं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 16, 2018 1:41 pm

Web Title: marathi actress prarthana behere aniket vishwasrao met with an accident she posts a massage on social media and thanked her fans for their blessings
Next Stories
1 बॉलिवूडची मल्लिका ‘कान’ महोत्सवात पिंजऱ्यात कैद
2 हुमाने अखेर केलं सलमानला ‘त्या’ नावाने हाक मारण्याचं धाडस
3 कर्नाटकच्या राज्यपालांविषयीचं ट्विट उदय चोप्राला पडलं महागात
Just Now!
X