News Flash

PHOTO : …अन् प्रार्थनाने त्याचीच साथ देण्याचा निर्णय घेतला

तिने शेअर केला साखरपुड्याचा फोटो

प्रार्थना बेहरे

मराठी कलाविश्वामध्ये लग्नसराईचे वारे वाहात आहेत असं म्हणायला हरकत नाही. कारण, अभिनेत्री प्राजक्ता हनमघरमागोमाग आता प्रार्थना बेहरेसुद्धा Prarthana Behere लग्नाच्या बेडीत अडकण्याच्या तयारीत आहे. प्रार्थनाचा अभिषेक जावकरशी Abhishek Jawkar नुकताच साखरपुडा झाला असून तिने इन्स्टाग्राम अकाऊंटवर फोटो पोस्ट केला आहे.

इन्स्टाग्रामवर पोस्ट करण्यात आलेल्या या फोटोमध्ये प्रार्थना आणि अभिषेक राजकन्या- राजकुमाराप्रमाणे दिसत असून, त्यांच्या साखरपुड्याच्या अंगठ्याही स्पष्टपणे दिसतात. प्रार्थनाने या फोटोला दिलेलं कॅप्शनही अनेकांचच लक्ष वेधत आहे. ‘…अन् आम्ही दोघांनी एकमेकांची शेवटपर्यंत साथ देण्याचा निर्णय घेतला’, असं कॅप्शन देत तिने #engaged #forlife #forevercommitted #lifepartner #myfiancé #happyme #godiskind असे हॅशटॅगही दिले आहेत.

सौंदर्य आणि मनमिळाऊपणामुळे प्रेक्षकांच्या मनात घर केलेली ही अभिनेत्री एक नवा प्रवास सुरु करण्यासाठी सज्ज झाली असल्याचं कळताच अनेकांनी तिला शुभेच्छा देण्यास सुरुवात केली. पण, आपली आवडती अभिनेत्री आता सिंगल राहिलेली नाही याची तिच्या अनेक ‘मेल फॅन्स’ना खंत वाटत आहे. प्रार्थना आणि अभिषेकचं लग्न विवाहमंडळाच्या मदतीने ठरलं असून, डेस्टिनेशन वेडिंगच्या रुपात त्यांच्या लग्नाचा थाट अनुभावयला मिळण्याची शक्यता आहे. १४ नोव्हेंबरला प्रार्थना विवाहबंधनात अडकणार असल्याचं म्हटलं जात आहे.

वाचा : प्रार्थना बेहरेच्या होणाऱ्या नवऱ्याबद्दल या गोष्टी माहितीयेत का?

विविध चित्रपटांच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवलेली ही अभिनेत्री सध्या बरीच व्यस्त असली तरीही काही खास क्षणांसाठी तिने वेळ काढला आहे. तिचा जोडीदार अष्टपैलू आहे असं म्हणायला काहीच हरकत नाही. कारण, तो लेखन, दिग्दर्शन आणि निर्मिती क्षेत्रात सक्रिय आहे. त्याने काही तेलुगू चित्रपटांचं वितरणही केलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 17, 2017 1:29 pm

Web Title: marathi actress prarthana behere got engaged with abhishek jawkar shares a photo
Next Stories
1 ‘शिवाजी पार्क मुंबई २८’ नक्की आहे तरी काय?
2 PHOTO: विनोदाची राणी अडकली विवाहबंधनात
3 BLOG : पटकथाच ‘सेन्सॉर’ केली तर?
Just Now!
X