02 December 2020

News Flash

अभिनेत्री- गायिका प्रियांका बर्वेला पुत्ररत्न; फोटो शेअर करत व्यक्त केला आनंद

प्रियांकाने शेअर केला बाळाचा पहिला फोटो

मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री-गायिका प्रियांका बर्वे हिच्या घरी काही दिवसांपूर्वीच एका चिमुकल्या बाळाचं आगमन झालं आहे. प्रियांकाने २० ऑगस्ट २०२० रोजी एक गोंडस बाळाला जन्म दिला आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रियांकाने ही माहिती चाहत्यांसोबत शेअर केली आहे.

प्रियांकाने इन्स्टाग्रामवर पती सारंग कुलकर्णी आणि तिच्या बाळासोबत एक फोटो शेअर केला आहे. या फोटोच्या कॅप्शनमध्ये आम्ही आई-बाबा झालो असं सांगत तिने बाळाचं नाव युवान असं ठेवलं आहे, असंही सांगितलं.

दरम्यान, प्रियांका सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर सक्रीय असून यापूर्वी तिने इन्स्टाग्रामवर तिच्या बेबीबंपसोबतचे अनेक फोटो शेअर केले होते. त्यानंतर तिने पहिल्यांदाच बाळाचा फोटो शेअर केला आहे. प्रियांका मराठी कलाविश्वातील नावाजेली अभिनेत्री आणि गायिका असून तिने ‘आनंदी गोपाळ’, ‘डबल सीट’, ‘रमा माधव’ या चित्रपटांसाठी पाश्वगायन केलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 1, 2020 4:35 pm

Web Title: marathi actress priyanka barve blessed baby boy ssj 93
Next Stories
1 घसरणाऱ्या अर्थव्यवस्थेवरुन अनुराग कश्यपचा केंद्राला टोला; म्हणाला…
2 “लडेंगे साथी जीतेंगे साथी”; डॉ. काफिल खान यांच्या सुटकेवर अभिनेत्याने व्यक्त केलं समाधान
3 ती व्यक्ती मुलींसाठी फार धोकायदायक; राम कदमांचे आभार मानणाऱ्या कंगनाला काँग्रेसचा सल्ला
Just Now!
X