News Flash

Video : सेलिब्रिटी झाल्यानंतर रिंकूला वाटते ‘या’ गोष्टीची खंत

तिच्याकडे एक लोकप्रिय सेलिब्रिटी म्हणून पाहिलं जातं, परंतु...

रिंकू राजगुरू हे नाव आता महाराष्ट्राला नवीन राहिलेलं नाही. नागराज मंजुळे यांच्या ‘सैराट’ या चित्रपटामुळे रिंकूला नवीन ओळख मिळाली. या चित्रपटानंतर रिंकूच्या पदरात ‘कागर’ हा चित्रपटात पडला. ‘सैराट’ आणि ‘कागर’ या दोन चित्रपटांच्या यशानंतर ती ‘मेकअप’ या आगामी चित्रपटामध्ये झळकणार आहे. विशेष म्हणजे ‘मेकअप’च्या माध्यमातून रिंकू पहिल्यांदाच नव्या रुपामध्ये प्रेक्षकांसमोर येणार आहे. कमी वयामध्ये रिंकूने खूप मोठं यश पाहिलं आहे. आज तिच्याकडे एक लोकप्रिय सेलिब्रिटी म्हणून पाहिलं जातं. परंतु हे सेलिब्रिटी आयुष्य जगत असताना रिंकूला एका गोष्टीची कायम खंत वाटते. ‘लोकसत्ता ऑनलाइन’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये रिंकूने तिची ही खंत व्यक्त केली.

रिंकू केवळ १८ वर्षांची असून सध्याचं तिचं वय कॉलेजमध्ये जाण्याचं, मित्र-मैत्रिणींमध्ये रमण्याचं आहे. मात्र तिच्या अफाट लोकप्रियतेमुळे तिला या कोणत्याच गोष्टी करायला मिळत नाही. सध्या ती चित्रपटांमध्ये व्यस्त असून त्याच्यासोबतच महाविद्यालयीन अभ्यासही पूर्ण करत आहे.

“जेव्हा मी कॉलेजच्या मुलांना पाहते तेव्हा मलाही वाटतं की त्यांच्याप्रमाणे कॉलेजमध्ये जावं, मित्र-मैत्रिणींमध्ये गप्पा माराव्या आणि मलाही एक जवळची मैत्रीण असावी, परंतु एक सेलिब्रिटी झाल्यामुळे मला या गोष्टी करता येत नाहीत”, असं रिंकू म्हणाली.

पुढे ती सांगते, “जशी कॉलेजला जाता येत नसल्याची खंत आहे, तसंच एक सेलिब्रिटी असल्याचा आनंददेखील आहे. कारण एवढ्या कमी वयात मला माझी वेगळी ओळख मिळाली आहे. आज देशभरात लोक मला माझ्या नावाने ओळखतात ही खरंच माझ्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे”.

दरम्यान, रिंकूची मुख्य भूमिका असलेला मेकअप हा चित्रपट ७ फेब्रुवारी रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटामध्ये रिंकूसोबत अभिनेता चिन्मय उदगीरकर स्क्रीन शेअर करणार आहे. यात रिंकू, पूर्वीची तर चिन्मय डॉ. नील यांच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 5, 2020 10:55 am

Web Title: marathi actress rinku rajguru after celebrity feel regret for this thing ssj 93
Next Stories
1 माझ्यामुळे ‘डर’मध्ये शाहरुख खान दिसला -राहुल रॉय
2 जया बच्चन यांच्यामुळे अभिषेक-करिश्माचा साखरपुडा मोडला का?
3 ‘सुखाच्या सरींनी हे मन बावरे’ फेम अभिनेत्री अडकली विवाहबंधनात
Just Now!
X