‘सैराट’ सिनेमातून महाराष्ट्रातील प्रत्येकाच्या मनावर राज्य करणाऱी अभिनेत्री रिंकू राजगुरु सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. रोज नवेनवे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करुन ती चाहत्यांचं लक्ष वेधून घेते.

रिंकू तिच्या वेगवेगळ्या लूकमधील फोटो आणि व्हिडीओ अनेकदा तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर करत असते. वेस्टर्न लूक असो किंवा भारतीय रिंकूच्या प्रत्येक लूकवर चाहते फिदा होताना दिसतात. नुकताच रिंकूने एक व्हिडीओ तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. हा व्हिडीओ ब्लॅक अ‍ॅण्ड व्हाईट असून यात रिंकू साडीमध्ये अतिशय सुंदर दिसतेय. तर या व्हिडीओत ती मनसोक्त हसताना दिसतेय. रिंकूच्या या हास्य़ानं अनेकांना भुरळ घातली आहे.

‘हास्य हा सर्वात सुंदर दागिना आहे’ अशा आशयाचं कॅप्शन रिंकूने तिच्या या व्हिडीओला दिलंय. रिंकूच्या या व्हिडीओवर लाईकचा वर्षाव पाहायला मिळतोय. तर ‘हंडरेड’ या वेब सीरिजमधील रिंकूचा सहकलाकार अभिनेता ताहेर शाबीर याने रिंकूला ‘सुंदर’ अशी कमेंट दिलीय. अनेक चाहत्यांनी हार्टचं इमोजी कमेंटमध्ये देत रिंकूचं कौतुक केलंय.

लवकरच रिंकू एका बिग बजेट मराठी सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘छूमंतर’ असं या सिनेमाचं नाव असून लंडनमध्ये या सिनेमाचं चित्रिकरण करण्यात आलंय. या सिनेमात रिंकूसोबत प्रार्थना बेहरे, ऋषी सक्सेना, सुव्रत जोशी हे कलाकाल मुख्य भूमिकेत झळकतील.