26 February 2021

News Flash

ऐन लग्नाच्या धामधुमीत दिसून आलं सईचं श्वानप्रेम, लाडक्या ‘मोका’ ची घेत होती काळजी

सोशल मीडियावर शेअर केले लाडक्या मोका सोबतचे खास फोटो

बिग बॉस मराठी फेम अभिनेत्री सई लोकूर नुकतीच विवाहबंधनात अडकली आहे. बेळगावमध्ये तीर्थदीप रॉय या तरुणासोबत सईचा विवाहसोहळा पार पडला. आपल्या साखरपुड्यापासून, बॅचलरेट पार्टीपर्यंत ते थेट लग्नसोहळ्यातील प्रत्येक क्षणाचे अपडेट्स सई सोशल मीडियावर आपल्या चाहत्यांसाठी पोस्ट करत आहे. या लग्नसराईत सईचं श्वानप्रेम दिसून आलं.

अवश्य पाहा – लग्नानंतर सईचा रोमँटीक अंदाज, नवऱ्यासोबतचे खास फोटो केले शेअर…

सईने आपल्या कुत्र्याचं नाव मोका असं ठेवलं आहे. एकीकडे लग्नसमारंभ सुरु असतानाही सई आपल्या लाडक्या मोकाची काळजी घेत होती. त्याला उचलून घेऊन फोटोसेशन करण्यापर्यंत ते त्याला खाऊ घालेपर्यंत सर्व लाड सईने पुरवले.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sai Lokur (@sai.lokur)

याआधीही सईने मोका सोबतचे आपले काही व्हिडीओ इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केले आहेत. सईचं तिच्या लाडक्या मोकावर खूप प्रेम असून त्याच्या वाढदिवसानिमीत्त काही दिवसांपूर्वी तिने स्वतःच्या हाताने खास केकही बनवला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 8, 2020 9:32 pm

Web Title: marathi actress sai lokue took care of her dog mocha during her wedding post special pictures with him psd 91
Next Stories
1 नोराचा ‘नाच मेरी रानी’ अल्बम यूट्यूबर ठरला सुपरहिट
2 शिवानी रांगोळेचं नवं मिशन
3 मराठी ओटीटी प्लॅटफॉर्म ‘लेट्सफ्लिक्स’ लवकरच..
Just Now!
X