News Flash

Video : याची देही,याची डोळा… ; पाहा सई लोकूरचा लग्नसोहळा

हळदीपासून रिसेप्शनपर्यंत... असा रंगला सईचा लग्नसोहळा; पाहा व्हिडीओ

बिग बॉस मराठी फेम अभिनेत्री सई लोकूरने महिन्याभरापूर्वीच तीर्थदीप रॉयसोबत लग्नगाठ बांधली. पारंपरिक मराठमोळ्या आणि बंगाली पद्धतीने सईचा विवाहसोहळा रंगला. त्यामुळे तिच्या लग्नातील प्रत्येक सोहळा हा चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय ठरला होता. लग्नानंतर सईने तिच्या या लग्नसोहळ्यातील काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. यात अलिकडेच तिने एक खास व्हिडीओ चाहत्यांसाठी शेअर केला आहे.

सईने इन्स्टाग्रामवर तिच्या लग्नाचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये लग्नसोहळ्यातील काही महत्त्वाचे क्षण कैद करण्यात आले आहेत. यात तिच्या हळदी समारंभापासून ते पाठवणीपर्यंत प्रत्येक विधी सुंदररित्या दाखवण्यात आली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sai Lokur (@sai.lokur)

पाहा फोटो >> Made For Each Other! लग्नानंतर सई-तिर्थदीपचे खास फोटो

दरम्यान, सईने शेअर केलेला हा व्हिडीओ लोकप्रिय ठरत असून चाहत्यांकडून या व्हिडीओर लाइक्स आणि कमेंट्सचा पाऊस पडत आहे. विराज आर्टने हा व्हिडीओ तयार केल्याचं दिसून येत आहे. सईने बेळगावच्या तीर्थदीप रॉयसोबत लग्नगाठ बांधली इसून तीर्थदीप मूळ कोलकाताचा असल्याचं सांगण्यात येतं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 1, 2021 1:47 pm

Web Title: marathi actress sai lokur wedding video goes viral ssj 93
Next Stories
1 ‘नव्या वर्षाचं स्वागत कसं करु?’ ; इरफानच्या पत्नीची भावूक पोस्ट
2 एका वर्षात कपिल शर्मा भरतो कोटयवधींचा टॅक्स; आकडा वाचून व्हाल थक्क
3 नवीन वर्षात दीपिकाचा महत्त्वाचा निर्णय; सोशल मीडियावरील पोस्ट केल्या डिलीट?
Just Now!
X