25 October 2020

News Flash

PHOTO : नव्या वर्षात सईचा बोल्ड अंदाज

'आय डिसाइड माय व्हाईब'

सई ताम्हणकर

मराठी चित्रपटसृष्टीत काही अभिनेत्रींच्या लोकप्रियतेविषयी फार काही न बोलणं फायद्याचं कारण, त्या अभिनेत्रींच्या चाहत्यांचा आकडा आणि दिवसागणिक बदलणारा अंदाजच सारं काही सांगून जातो. अशा अभिनेत्रींच्या यादीतील एक नाव म्हणजे सई ताम्हणकर. ‘दुनियादारी’ चित्रपटात जुन्या काळातील भूमिका साकारत सनीने प्रेक्षकांवर एक वेगळीच छाप पाडली. फॅशन, ग्लॅमर, मादक अदा या गोष्टींचा अंदाज घेणाऱ्या या अभिनेत्रीने स्वत:मध्येही तितकेच बदलही घडवले. २०१८ मध्येही ती नव्या रुपात आणि नव्या अंदाज सर्वांच्या भेटीला आली आहे.

खुद्द सईनेच तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन एक फोटो पोस्ट केला असून, या फोटोमध्ये तिचा ‘डेव्हिल लूक’ पाहायला मिळतोय. नवीन वर्षाच्या शुभेच्छा देण्याऱ्या सेलिब्रिटींच्या गर्दीत सईने तिचे वेगळेपण जपत हटके अंदाजात शुभेच्छा दिल्या आहेत. ‘आय डिसाइड माय व्हाईब’, असे लिहित तिने हा फोटो पोस्ट केला आहे.

वेगळ्याच अंदाजातील हा फोटो पाहून सई एका हॉलिवूड अभिनेत्रीप्रमाणे दिसतेय. तिचा हा बोल्ड अंदाज टिपण्याचे श्रेय जाते सेलिब्रिटी फोटोग्राफर तेजस नेरुरकरला. हजारो लाइक्स मिळवणारा हा फोटो पाहून तेजसच्या कॅमेऱ्याने सईच्या अदा सुरेखपणे टिपल्या आहेत, असे म्हणायला हरकत नाही.

VIDEO : केप टाऊनमध्ये अनुष्का फिरण्यात दंग, तर विराटवर चढला भांगड्याचा रंग

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 1, 2018 6:24 pm

Web Title: marathi actress sai tamhankar new year 2018 new look bold look
Next Stories
1 नववर्षात किंग खानची चाहत्यांना अनोखी भेट
2 VIDEO : खिलाडी कुमारची नव्या वर्षात झेप
3 आलिया- सिद्धार्थमध्ये पुन्हा बिनसलं?
Just Now!
X