एका नवोदित अभिनेत्याला धमकी देऊन खंडणी उकल्याप्रकरणी अभिनेत्री सारा श्रवणला अटक केल्याची सध्या जोरदार चर्चा रंगत आहे. यामध्ये साराने सोशल मीडियाच्या माध्यमातून तिचं मत मांडलं असून “कोणत्याही कथाकथित गोष्टींवर विश्वास ठेऊ नका. या साऱ्याचा मला आणि माझ्या कुटुंबियांना प्रचंड मनस्ताप होत असल्याचं,” सांगितलं आहे. साराने फेसबुकवर लाइव्ह येत तिची बाजू मांडली आहे.
“कोणत्याही गोष्टीची शहानिशा केल्याशिवाय त्यावर विश्वास ठेवू नका. सध्या माझ्याविषयी अनेक चर्चा रंगत आहेत.मात्र या कथाकथित गोष्टी असून त्याचा मला आणि माझ्या कुटुंबियांना प्रचंड त्रास होत आहे. मी माझ्या पाच महिन्यांच्या बाळाकडेही नीट लक्ष देऊ शकत नाहीये”, असं साराने सांगितलं.
पुढे ती म्हणाली, “तुमचा पाठिंबा असाच माझ्या पाठीशी असू द्या. माझा न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे आणि या प्रकरणी काय खरं, काय खोटं हे न्यायालयात साऱ्यांना माहित आहे”.
दरम्यान, ‘रोल नंबर १८’ या चित्रपटातील अभिनेत्याविरोधात कटकारस्थान करुन त्याच्याकडून खंडणी उकळल्याप्रकरणी साराला पुणे पोलिसांनी अटक केली होती. मात्र १५ हजारांच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला. तसंच तिला न्यायालयाच्या परवानगीशिवाय देश सोडून जाता येणार नाही, असंही सांगण्यात येत आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on December 2, 2019 2:29 pm