काळ कितीही बदलला तरीदेखील काही प्रथा,परंपरा या कायम राहतात. त्यातलंच एक उदाहरण घ्यायचं झालं तर, ते म्हणजे लग्नाचा ‘बस्ता’. आजही लग्न म्हटलं की घरात आनंदाचं, उत्साहाचं वातावरण पाहायला मिळतं. मग लग्नाची एक-एक तयारी करत असताना लग्नाचा बस्ता बांधायचा कार्यक्रम हमखास होतो. मग प्रत्येकाच्या आवडीनिवडीचंकापड, नवऱ्या मुलीची साडी,नातेवाईकांच्या पसंतीचे कपडे हे सारं घेतलं जातं.यातही बजेटचा प्रश्न असतोच. त्यामुळे एकंदरीत मुलीच्या वडिलांची तारेवरची कसरत सुरु असते. याच लग्नबस्त्यावर आधारित बस्ता हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. विशेष म्हणजे त्यापूर्वी या चित्रपटाचा भन्नाट ट्रेलर प्रदर्शित झाला आहे.

प्रदर्शित झालेल्या ट्रेलरमधून या चित्रपटाची कथा लग्नसोहळ्याभोवतीच फिरताना दिसत आहे. त्यातही वडील आणि मुलीच्या नात्यातील हळुवारपणावर प्रकाश टाकण्यात आला आहे. मुलीच्या सुखासाठी शेतकरी वडिलांची चाललेली धडपड यात पाहायला मिळते. अभिनेत्री सायली संजीव या चित्रपटात मुख्य भूमिका साकारत असून स्वाती असं तिच्या भूमिकेचं नाव आहे. तर सुहास पळशीकर यांनी तिच्या वडिलांची भूमिका साकारली आहे

Denial of child custody on charges of adultery is wrong
व्याभिचाराच्या आरोपास्तव अपत्याचा ताबा नाकारणे चुकीचे
Puppy beaten, Pimpri,
Video : पिंपरीत श्वानाच्या पिल्लाला बेदम मारहाण; गुन्हा दाखल, मारहाण करतानाचा व्हिडिओ व्हायरल
Why did Lawrence Bishnoi gang fire outside Salman Khans house What is the extent of this gang
लॉरेन्स बिष्णोई टोळीने सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार का केला? या टोळीची व्याप्ती किती? पुन्हा हल्ला करण्याची धमकी किती गंभीर?
Balaji temple plot, CIDCO,
बालाजी मंदिर भूखंडाविरोधात याचिका, २५ एप्रिलला सुनावणी; सिडकोचा हरकतीचा मुद्दा फेटाळल्याचा दावा

आणखी वाचा- लग्नानंतर वरुण आणि नताशाचा ‘तो’ फोटो झाला व्हायरल

आपल्या लेकीला स्वातीला नोकरदार नवराच करायचा असं नामदेवरावांनी (सुहास पळशीकर) पक्क ठरवलं असतं. काही स्थळं बघितल्यावर सरकारी नोकरीत कार्यरत असणारा विकास चौधरी (सूरज पवार) स्वातीला आवडतो. मात्र, लग्न थाटामाटात झालं पाहिजे हा मुलाकडील मंडळींचा हट्ट असतो. त्यामुळे आपल्या लेकीच्या सुखासाठी नामदेवराव यांनी वरपक्षाची मागणी पूर्ण करण्याचा शब्द देतात आणि त्यासाठी जीवाचं रान करतात. लग्नाची बोलणी झाल्यावर लग्नाच्या कामाची सुरुवात बस्ता बांधण्यापासून होते. बस्त्यासाठी अनेक अडचणी येतात, काही मजेदार किस्से घडतात, भावूक क्षणही येतात, असं एकंदरीत या ट्रेलरमध्ये दाखवण्यात आलं आहे.

आणखी वाचा- All Set! ‘या’ दिवशी होणार वरुण-नताशाच्या लग्नाची रिसेप्शन पार्टी

दरम्यान, तानाजी घाडगे दिग्दर्शित ‘बस्ता’ हा चित्रपट येत्या २९ जानेवारी रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाची निर्मिती सुनील राजाराम फडतरे करत असून यात सायली संजीव, सुहास पळशीकर, शुभांगी गोखले, अक्षय टांकसाळे, पार्थ भालेराव, प्राजक्ता हनमगर, सूरज पवार, अरबाज शेख, पल्लवी पाटील, भारत गणेशपुरे, सागर कारंडे, योगेश शिरसाट अशी दिग्गज कलाकार मंडळी झळकणार आहेत.