29 January 2020

News Flash

‘H2O’ फेम शीतलने अशा पद्धतीने साजरा केला वाढदिवस

हा वाढदिवस कायम लक्षात राहण्यासारखा आहे असं ती म्हणते

केवळ सामाजिक भान जपण्यासाठी म्हणून नव्हे तर खरोखर समाजाप्रती असणारा कळवळा काही कलाकारांना स्वस्थ बसू देत नाही. कधी-कधी अभिनयातून तर जिथे शक्य तिथे आपल्या कृतींतून समाजाचे देणे फेडणारे कलाकार काही कमी नाहीत. त्यातलंच एक ओळखीचं नाव म्हणजे शीतल अहिरराव. विविध म्युझिक अल्बम्स आणि चित्रपटांमधून दिसणारी ही प्रॉमिसिंग अभिनेत्री प्रत्यक्ष जीवनातही तितकीच कर्तव्यतत्पर आहे. ‘H2O कहाणी थेंबाची’ या अलीकडेच प्रदर्शित झालेल्या चित्रपटात ती प्रमुख नायिकेच्या भूमिकेत दिसली होती. आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना भुरळ पडणारी शीतल अहिरराव चित्रपटाप्रमाणेच प्रत्यक्षात ही समाजप्रबोधन घडवत असून नाशिकमधील उंटवाडी रोडवरील निरीक्षण गृह व बालगृहातील गरीब-अनाथ मुलांना ‘H2O कहाणी थेंबाची’ हा चित्रपट दाखवून आनंद घेतला.
या मुलांसोबत वाढदिवस साजरा करुन त्यांच्या आयुष्यात थोडा का होईना आनंद आणू शकले तर हेच माझ्यासाठी मोठ गिफ्ट आहे, असं तिने सांगितलं. शीतलला याआधी ‘वॉक तुरु तुरु’, ‘लई भारी पोरी’, ‘इश्काचा किडा’ या म्युझिक अल्बम्समधून शिवाय ‘जलसा’, ‘मोल, ‘व्हीआयपी गाढव’, ‘फक्त एकदाच’, ‘होरा’, ‘सलमान सोसायटी’  यांसारख्या चित्रपटांतून पाहिलेलं आहे. मराठी मनोरंजनक्षेत्रातला हा प्रॉमिसिंग चेहेरा आता चित्रपटसृष्टीत चमकू पाहणारा उभारता तारा आहे. महोत्सवांत गाजणाऱ्या ‘H2O कहाणी थेंबाची’ या मराठी चित्रपटात तिने उल्लेखनीय कामगिरी केलेली असून आपल्या पदार्पणातच शीतलने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.
‘H2O’ या चित्रपटात सियाची मध्यवर्ती भूमिका साकारणारी शीतल अहिरराव आपल्या आगामी कारकिर्दीत एका हिंदी मालिकेतही झळकणार आहे. या मालिकेची घोषणा लवकरच होणार आहे. शीतलचा अभिनय क्षेत्रातील प्रवास विविधतेने नटलेला असून शीतल आपल्या कामाविषयी प्रचंड जागरूक आहे. तिच्या प्रयत्नांना रसिकांच्या पसंतीची पावती नक्कीच मिळेल ह्यात काही शंका नाही.

First Published on April 25, 2019 6:59 pm

Web Title: marathi actress sheetal ahirrao birthday celebration
Next Stories
1 सलमान खानविरोधात तक्रार दाखल
2 Kagar Movie Review : राजकारणात रंगलेला त्यांच्या प्रेमाचा ‘कागर’
3 ‘…तर येणारी ५ वर्षं तुम्हाला तुमचं मतंच नसेल’, राजकारणाबाबत रेणुका शहाणेंचं परखड मत
Just Now!
X