गेल्या अडीच- तीन महिन्यांनंतर देशात हळूहळू अनलॉकची प्रक्रिया सुरु झाली आहे. यात चित्रपट, मालिका यांच्या चित्रीकरणाला देखील परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे सध्या विशेष काळजी घेत अनेक मालिका, चित्रपटांचं चित्रीकरण पुन्हा एकदा सुरु झाल्याचं दिसून येत आहे. यामध्येच अभिनेत्री शीतल अहिरराव हीदेखील तिच्या आगामी चित्रपटासाठी सज्ज झाली आहे. नाशिकमध्ये तिच्या चित्रपटाचं चित्रीकरण सुरु झाल्याचं सांगण्यात येत आहे.

अनेक गाजलेल्या मराठी चित्रपट आणि म्युझिक अल्बममधून प्रेक्षकांच्या भेटीला आलेली शीतल लवकर एका नव्या चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटाचं नाव अद्याप गुलदस्त्यात असून चित्रीकरणाला मात्र सुरुवात झाली आहे. या सेटवरील काही फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेत आले आहेत. सध्या चित्रपटाच्या सेटवर विशेष काळजी घेण्यात येत आहे. आखून दिलेले नियम आणि अटी या सगळ्यांचं सेटवर पालन करण्यात येत आहे.

The Kerala Story screening in church
‘लव्ह जिहाद’चं कारण देत विद्यार्थ्यांना दाखवला ‘द केरला स्टोरी’ चित्रपट; केरळच्या चर्चमधला प्रकार!
Mukta Barve and Madhugandha Kulkarni worked together Naach ga ghuma film for the first time after 20 years of frendship
२० वर्षांच्या मैत्रीत मुक्ता बर्वे आणि मधुगंधा कुलकर्णी यांनी पहिल्यांदाच केलं एकत्र काम; ‘नाच गं घुमा’ चित्रपटामुळे मिळाली संधी
crew movie review by loksatta reshma raikwar
Crew Movie Review : रंजक सफर
Devendra Fadnavis after Swatantrya Veer Savarkar
‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ चित्रपट पाहिल्यानंतर फडणवीसांची राहुल गांधींसाठी खास ऑफर; म्हणाले, “मी माझ्या खर्चाने…”

दरम्यान, शीतल ‘व्हीआयपी गाढव’, ‘जलसा’, ‘मोल’, ‘फक्त एकदाच’, ‘होरा’, ‘सलमान सोसायटी’, ‘H2O कहाणी थेंबाची’ या सारख्या चित्रपटात झळकली आहे. तर ‘वॉक तुरु तुरु’, ‘लई भारी’, ‘इश्काचा किडा’ या म्युझिक अल्बममधूनदेखील ती प्रेक्षकांच्या भेटीस आली आहे.