अभिनेत्री स्मिता गोंदकर ही तिच्या ग्लॅमरस आणि बिनधास्त अंदाजामुळे कायम चर्चेत असते. मराठी ‘बिग बॉस’मुळे स्मिता खऱ्या अर्थाने घराघरात पोहचली आहे. स्मिता सोशल मीडियावरदेखील चांगलीच सक्रिय असते. वेगवेगळे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत ती चाहत्यांशी संपर्क साधत असते.

काही दिवसांपूर्वीच स्मिताने मराठमोळ्या लूकमध्ये एक फोटो शूट केलं होतं. नऊवारी साडी, त्यावर पारंपरिक दागिने, नथ, केसात माळलेला गजरा असा स्मिताचा मराठमोळा साज प्रेमात पाडणारा आहे. स्मिताचा बोल्ड लूक जितका चर्चेचा विषय असतो. तितकाच हा पारंपरिक लूकदेखील चर्चेत आहे. याआधी स्मिताने घोडेस्वारी करत फोटो शूट केलं होतं.

uddhav balasaheb thackeray criticized mahayuti candidate sandipan bhumre
मद्य परवान्यांचा विषय ठाकरे गटाकडून ऐरणीवर; उमेदवारी जाहीर होताच भुमरे यांची कोंडी करण्याचा प्रयत्न
Orenthal James Simpson
स्पोर्ट्समन, सेलेब्रिटी… मग पत्नीची हत्या, निर्दोष मुक्तता तरी कफल्लक आयुष्य… ओ. जे. सिम्प्सन यांचे आजही अमेरिकेवर गारूड कसे?
Nashik Elderly Mans Enthusiastic Dance with old aged friends
“मी पाहिले तुझ्या डोळ्यांच्या आतुन..” नाशिकच्या आजोबांनी मित्रांसह केला मनसोक्त डान्स, VIDEO पाहून नेटकरी म्हणाले, “आयुष्याचा खरा आनंद..”
chirag paswan interview
काका-पुतण्यांमधील राजकीय लढाईचा अंत? काय म्हणाले चिराग पासवान?

यानंतर नुकतचं स्मिताने बैलगाडी हाकत एक फोटो शूट केलं आहे. मराठमोळ्या अंदाजात स्मिता बैलगाडी हाकत असल्याचं या फोटोत दिसतंय. या फोटोंना चाहत्यांची मोठी पसंती मिळतेय. तर या फोटोशूट दरम्यान बैलगाडी हाकत असतानाचा एक व्हिडीओ स्मिताने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे.

स्मिताने या व्हिडीओच्या कॅप्शन मध्ये म्हंटलंय, “शूटिंगमुळे अनेक नव्या गोष्टी अनुभवता येतात आणि या शूटमुळे मला माझं बैलगाडी चालवण्याचं स्वप्न पूर्ण करता आलं.” स्मिताच्या व्हिडीओला चाहत्यांची चांगलीच पसंती मिळतेय.