News Flash

स्पृहाला मिळालेलं ‘ग्रेटेस्ट गिफ्ट’

स्पृहाने नेहमीच तिच्या अभिनयाद्वारे प्रेक्षकांची मने जिंकली आहेत

स्पृहा जोशी

मराठी कलाकार आणि त्यांच्या सोशल मीडियावर होणाऱ्या पोस्ट पाहता चाहत्यांच्या मनात या विषयी नेहमीच कुतूहल पाहायला मिळते. त्यातही काही कलाकार त्यांच्या चाहत्यांना कधीही निराश करत नसल्यामुळे तो किंवा ती अभिनेत्री/अभिनेता आपल्या कुटुंबातीलच एक व्यक्ती होऊन जातात. पण, या कलाकारांच्या खऱ्या खुऱ्या कुटुंबात कोण कोण असेल? त्यांच्यातील नात्यांचे बंध कसे असतील असे अनेक प्रश्नही चाहत्यांच्या मनात घर करत असतात. चाहत्यांच्या गराड्यात असलेली अशीच एक अभिनेत्री म्हणजे स्पृहा जोशी.

मराठी चित्रपट आणि मालिकांमधील प्रसिद्ध अभिनेत्री स्पृहा जोशी हिने नेहमीच आपल्या अभिनयाची जादू प्रेक्षकांवर केली आहे. तर ‘लोपामुद्रा’ या आपल्या काव्य संग्रहानेही ती प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतेय. दरम्यान, सोशल मीडियावर सक्रिय असलेल्या स्पृहाने तिला मिळालेल्या एका खास भेटीचा फोटो फेसबुकवर शेअर केला आहे. हा फोटो आहे तिच्या कुटुंबाचा. ‘फॅमिली… ग्रेटेस्ट गिफ्ट’ अशा कॅप्शनसह स्पृहाने तिचा सहकुटुंब सहपरिवार असा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत स्पृहासोबत तिचे आई-बाबा आणि बहिण दिसत आहेत.


स्पृहाने हा फोटो पोस्ट करताच त्यावर तिच्या फॉलोअर्सनीही कमेंट्स करत त्यांच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. कुटुंब हे कोणासाठीही फार मह्त्त्वाचे असते. या फोटोतून स्पृहाचे कुटुंबप्रेम पाहायला मिळत आहे. विविध मालिका, चित्रपट आणि नाटकाच्या माध्यमातून स्पृहाने स्वत:चा असा एक वेगळा प्रेक्षकवर्ग निर्माण केला आहे. तिने आतापर्यंत ‘मोरया’, ‘अ पेइंग घोस्ट’, ‘लॉस्ट अॅण्ड फाउंड’ या चित्रपटांमध्येही काम केले आहे. नेहमीच शांत, सोज्वळ भूमिकेत असलेल्या या कवीमनाच्या अभिनेत्रीने अनेकांचीच मने जिंकली आहेत असे म्हणायला हरकत नाही. काही दिवसांपूर्वीच स्पृहा तिच्या एका फोटोशूटमुळे चर्चेत आली होती. स्पृहा लवकरच गश्मीर महाजनीसोबत आगामी चित्रपटात झळकणार आहे. गश्मीर महाजनी आणि स्पृहा जोशीची ही जोडी फिल्मी किडा प्रॉडक्शन्स यांच्या आगामी मराठी चित्रपटातून आपल्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचं नाव अद्याप गुलदस्त्यात आहे. नुकताच या सिनेमाचा मुहूर्त चित्रपटाचे निर्माते पी. एस. छतवाल यांच्या हस्ते पार पडला. यावेळी चित्रपटाचे सह-निर्माते रवी सिंह, दिग्दर्शक समीर विद्वांस यांच्याबरोबर इतर कलाकार मंडळी उपस्थित होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 20, 2017 5:39 pm

Web Title: marathi actress spruha joshi share her family photograph on social media
Next Stories
1 करिना म्हणते सैफ, शाहिद सर्वोत्तम
2 ‘तू सूरज मै सांझ पिया जी’; लवकरच येतोय ‘दिया और बाती हम’चा सिक्वल
3 मिलिंदने रोवला अटकेपार झेंडा; ‘आयर्नमॅन’ बनला ‘अल्ट्रामॅन’
Just Now!
X