News Flash

PHOTO : बॉलिवूडच्या ‘चांदनी’ला तेजश्रीने वाहिली अनोखी श्रद्धांजली

#TributeToOurChandani या हॅशटॅगसह तिने काही फोटो पोस्ट केले

छाया सौजन्य- तेजस नेरुरकर

काही व्यक्ती आपल्या जीवनप्रवासात अशा काही गोष्टी करुन जातात ज्यामुळे त्यांच्या जाण्यानंतरही विविध रुपांमध्ये त्यांचं अस्तित्व आपल्याला जाणवतं. अशाच व्यक्तींमधील एक नाव म्हणजे अभिनेत्री श्रीदेवी. ‘चांदनी’पासून ‘मॉम’पर्यंतचा त्यांचा प्रवास आजही चित्रपट रसिक विसरलेले नाहीत. काही दिवसांपूर्वीच चिरतरुण सौंदर्याची देणगी लाभलेल्या श्रीदेवी यांनी जगाचा निरोप घेतला. त्यांच्या जाण्याने फक्त बॉलिवूडच नव्हे, तर संपूर्ण कलाविश्वातच एक पोकळी निर्माण झाली आहे. अशा या अभिनेत्रीला कलाकार मंडळींनी आपआपल्या परिने श्रद्धांजली वाहिली. त्यातच आता मराठी अभिनेत्री तेजश्री प्रधानचाही समावेश झाला आहे.

तेजश्रीने चार्ली चॅप्लिन यांच्या वेशात तयार होत ‘मिस्टर इंडिया’ या चित्रपटात श्रीदेवी यांनी साकारलेल्या भूमिकेचीच आठवण करुन देत काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. प्रसिद्ध सेलिब्रिटी छायाचित्रकार तेजस नेरुरकर याने चार्लीच्या रुपातील तेजश्रीच्या अनोख्या आणि खोडकर अदा टिपल्या आहेत. श्रीदेवी आणि तेजश्री या दोघींचेही फोटो एकत्र पाहिलं असता त्यांच्या चेहऱ्यात बरंच साम्य आढळत आहे.

पाहा : Video: अखेरच्या चेंडूवर षटकार खेचत कार्तिक ठरला हिरो, तो क्षण पुन्हा एकदा अनुभवायचा आहे??

सूरज माने यांचा मेकअप आणि सुजाता या हेअरस्टाइलिस्टच्या मेहनतीमुळेच तेजश्रीचा हा लूक लक्षवेधी ठरत आहे. #TributeToOurChandani असा हॅशटॅग लावत तिने पोस्ट केलेल्या या फोटोंना अनेकांनीच लाइक केलं. अनोख्या आणि तितक्याच कलात्मक मार्गाने श्रीदेवी यांना वाहिलेल्या श्रद्धांजलीबद्दल तिचं अनेकांनी कौतुकही केलं आहे.
तेजश्री सध्या ‘असेही एकदा व्हावे’ या चित्रपटाच्या प्रसिद्धीत व्यग्र आहे. या चित्रपटातून ती एका आरजेच्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ६ एप्रिलला प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटातून ती उमेश कामतसोबत स्क्रीन शेअर करणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 19, 2018 1:16 pm

Web Title: marathi actress tejashree pradhan pays tribute to late actress sridevi see photos
Next Stories
1 VIDEO : माधुरी की जॅकलीन? तुम्हाला कोणती ‘मोहिनी’ आवडली?
2 ‘करिअरपेक्षा माझ्या वैयक्तिक आयुष्यातील प्रश्नांचा सामना करणं हाच मोठा संघर्ष’
3 या पद्धतीने इरफान खानच्या ट्युमरवर उपचार होऊ शकतो
Just Now!
X