सध्या मराठीमध्ये सुरु असलेल्या प्रत्येक मालिकांमध्ये मुख्य भूमिकेत ब्राह्मण मुलीच दिसतात. मग इतर मराठी मुली का नाही? असा सवाल ‘केसरी’ चित्रपटाचा दिग्दर्शक सुजय डहाके यांनं उपस्थित केला होता. लोकसत्ताला ऑनलाइनला दिलेल्या विशेष मुलाखतीत त्यानं हा दावा केला. त्यानंतर अनेक स्तरातून त्याच्या वक्तव्यावर निरनिराळ्या प्रतिक्रिया उमटू लागल्या होत्या. यानंतर आता मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री तेजश्री प्रधान हीदेखील सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त झाली आहे. मी ब्राह्मण नाहीये तरी माझ्याकडे काम आहे, असं तेजश्री म्हणाली.

तेजश्री प्रधान हिनं आपल्या फेसबुक वॉलवर एक पोस्ट शेअर केली आहे. “मी ब्राह्मण नाहीये बरं! सीकेपी आहे. पण गेली अनेक वर्ष माझ्याकडे काम आहे. याला टॅलेंट म्हणूया का?”, अशा आशायची पोस्ट तिनं आपल्या फेसबुक वॉलवर शेअर केली आहे.

switching your exercise routine have several benefits
काही ठराविक महिन्यानंतर व्यायामामध्ये बदल करणे आवश्यक आहे? जाणून घ्या, तज्ज्ञ काय सांगतात..
narendra modi, PM Narendra Modi,
हुकमी ‘नॅरेटिव्ह’ने यंदा मोदींना हुलकावणी दिली आहे का?
Prime Minister Modi asserted that the gaming industry does not need regulation
‘गेमिंग उद्याोगा’ला नियमनाची गरज नाही! पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन; आघाडीच्या गेमर्सशी संवाद
shrikant shinde
“राज ठाकरे महायुतीत आले, तर…”; मनसेच्या युतीतील प्रवेशाच्या चर्चांवर श्रीकांत शिंदेंची प्रतिक्रिया

सध्या अनेक वाहिन्यांवर सुरू असलेल्या मराठी मालिकांमध्ये ब्राह्मणच मुली प्रमुख भूमिकांमध्ये दिसतात, असं वक्तव्य सुजयनं केलं होतं. यावेळी बोलताना त्यानं एक उदाहरणही दिलं. “एक व्हाईट कॉलर क्लास आहे तो याला कंट्रोल करतोय आणि आपल्याला मराठी चित्रपटसृष्टी किती छान चाललीये असं वाटतं,” असं तो बोलताना म्हणाला होता. तसंच आपल्या २३ व्या वर्षी राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याचा काहींना राग आहे, असंही त्यानं नमूद केलं होतं.