आज नवरात्रीचा पहिला दिवस म्हणजे घटस्थापना. घरोघरी आज देवीची स्थापना झाली आहे,घट बसले आहेत. त्यामुळे सर्वत्र आनंदाचं आणि चैतन्याचं वातावरण आहे. यामध्येच अभिनेत्री तेजस्विनी पंडितदेखील दरवर्षीप्रमाणे यंदाही समाजात घडणाऱ्या घटनांवर अनोख्या कलाकृतीच्या माध्यमातून व्यक्त झाली आहे. देवीच्या रुपातील पहिला फोटो तिने शेअर केला आहे. विशेष म्हणजे या फोटोच्या माध्यमातून तिने डॉक्टर आणि अन् वैद्यकीय कर्मचाऱ्यांना सलाम केला आहे.

सध्या देशावर करोनाचं संकट आहे. त्यामुळे या काळात गेल्या ४-५ महिन्यांपासून देशातील डॉक्टर आणि अन्य वैद्यकीय कर्मचारी सातत्याने रुग्णांची सेवा करत आहेत. त्यामुळे डॉक्टर हा देवाचाच एक अंश आहे असं सांगत तिने डॉक्टरांच्या कार्याला सलाम केलं आहे. सध्याच्या काळात डॉक्टर त्यांच्या जीवाची पर्वा न करता रुग्णांचे प्राण वाचविण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे ते रुग्णांसाठी एकप्रकारे देवच झाले आहेत. म्हणूनच, तेजस्विनीने पीपीई किटमधील एक फोटो शेअर केला आहे.

nilesh sambre, kapil patil
“कपिल पाटील डोळ्यांची शस्त्रक्रिया करा”, नीलेश सांबरे यांचे खासदार कपिल पाटील यांना प्रत्युत्तर
Girls sexually assaulted by bakery owner in Nalasopara
नालासोपार्‍यात बेकरीचालकाकडून लहान मुलींवर लैंगिक अत्याचार, आतापर्यंत ४ पीडितांच्या तक्रारी
Loksatta chaturang Decisive women vote in election
निर्णायक ठरणारी स्त्री-मतं!
This video of an elderly cobbler and two stray dogs in Mumbai
“जगातील सर्व श्रीमंतापेक्षा श्रीमंत आहे हा व्यक्ती”! भटक्या कुत्र्यांना प्रेमाने थोपटणाऱ्या काकांचा हृदयस्पर्शी Video Viral

 

View this post on Instagram

 

प्रतिपदा : . . दैत्याने जिंकण्या मला देह तुझाच वेठीस धरला… अन मग मी सोडून त्रिशूळ भाला हाती stethoscope धरला… घुस्मटला जीव जरी हिम्मत तुझी सोडू नकोस आईच उभी आहे PPE किट मागे विसर त्याचा पाडू नकोस, विसर त्याचा पाडू नकोस. . . Design & Illustration : @indian_illustrator Photographer : @vivianpullan Writer : @rjadhishh_live Concept & Director : @dhairya_insta_ . . #navratri2020 #devi #devbarekaro #coronawarriors #thankyou #doctors #nurses #wardboys #healthcareworkers #tejaswwini #gratitude

A post shared by Tejaswwini (@tejaswini_pandit) on

“प्रतिपदा : दैत्याने जिंकण्या मला देह तुझाच वेठीस धरला…
अन मग मी सोडून त्रिशूळ भाला हाती stethoscope धरला…
घुस्मटला जीव जरी हिम्मत तुझी सोडू नकोस, आईच उभी आहे PPE किट मागे
विसर त्याचा पाडू नकोस, विसर त्याचा पाडू नकोस”, अशी पोस्ट तेजस्विनी पंडितने शेअर केली आहे.

दरम्यान, तेजस्विनीने शेअर केलेल्या फोटोमध्ये देवी पीपीई किटमध्ये दिसत आहे. तेजस्विनी आपल्या अनोख्या कलाकृतींच्या माध्यमातून समाजाला भेडसावणाऱ्या प्रश्नांवर व्यक्त होत आहे. ती गेली तीन वर्षं नवरात्रोत्सव वेगवेगळ्या संकल्पनांच्या माध्यमातून नारीशक्तीचा आविष्कार घडवत असते.