अभिनेत्री तेजस्विनी पंडितने आज देवीच्या रुपातील तिचा पाचवा फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये भूतदयेचं दर्शन होताना दिसत आहे. देवी ज्याप्रमाणे सृष्टीची, माणसांची काळजी घेते त्याचप्रमाणे तिचं पृथ्वीवरील मुक्या जीवांकडेही लक्ष असतं हे या फोटोतून दाखवण्यात आलं आहे.

करोना संकटामध्ये देशात लॉकडाउन घेण्यात आला. या काळात अनेकांची उपासमार झाली. त्यात भटक्या जनावरांचीदेखील वणवण होताना दिसली. त्यामुळे अशा मुक्या प्राण्यांना एक तरुण मुलगी प्रेमाने अन्न भरवताना दिसत आहे. तिच्यात जणू देवीचं या मुक्या प्राण्यांची काळजी घेतल्याचं दिसून येत आहे.

The Phenom Story Music Surili Maithili thakur YouTube channel
फेनम स्टोरी: सुरिली मैथिली
feast of snowballs juicy fruits and green fodder for animals at Karunashram Orphanage in Wardha
वन्यप्राणी करताहेत उन्हाळा एन्जॉय! बर्फ के गोले, रसभरीत फळे अन हिरवा चारा यांची मेजवानी
1 to 7 April 2024 Weekly Horoscope
७ एप्रिलपर्यंत लक्ष्मी नारायणासह ३ राजयोग बनल्याने कर्क- कन्यासह ‘या’ राशी जगतील अच्छे दिन, १२ राशींचे भविष्य वाचा
Crowd of devotees on the occasion of Tukaram Beej sohala in Dehu
पिंपरी : देहूमध्ये तुकाराम बीज सोहळ्यानिमित्त भाविकांची अलोट गर्दी

“विषाणूने या जगाची केली कैसी ही दैना. मुक्या लेकरांचे या, अश्रु कुणी पुसेना. आबाळ या जीवांची…आईस साहवेना. मनुष्यरूप घेऊनि धरी, साक्षात आली अन्नपूर्णा”, अशी कॅप्शन तेजस्विनीने या फोटोला दिली आहे.

 

View this post on Instagram

 

पंचमी . . विषाणूने या जगाची केली कैसी ही दैना मुक्या लेकरांचे या, अश्रु कुणी पुसेना आबाळ या जीवांची…आईस साहवेना मनुष्यरूप घेऊनि धरी, साक्षात आली अन्नपूर्णा Design & Illustration : @indian_illustrator Photographer : @vivianpullan Writer : @rjadhishh_live Concept & Director : @dhairya_insta_ . . #navratri2020 #devi #देवमाणसं #दैवीकर्म #भूतदया #devbarekaro #coronawarriors #thankyou #animalwelfare #animalrescue #shelterhomes #animalcare #fostercare #adoptdontshop #tejaswwini #gratitude #tribute

A post shared by Tejaswwini (@tejaswini_pandit) on

दरम्यान, तेजस्विनी दरवर्षी नवरात्रीमध्ये अनोख्या पद्धतीने देवीच्या वेशातील फोटो शेअर करत असते. आपल्या अनोख्या कलाकृतींच्या माध्यमातून समाजाला भेडसावणाऱ्या प्रश्नांवर व्यक्त होत आहे. ती गेली दोन वर्षं नवरात्रोस्तवात वेगवेगळ्या संकल्पनांच्या माध्यमातून नारीशक्तीचा आविष्कार घडवत असते. यंदा ती महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या देवींच्या रुपातून या समस्यांवर व्यक्त होत आहे.