नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये दररोज देवीच्या रुपात समाजातील घडामोडींवर भाष्य करणाऱ्या तेजस्विनी पंडितने नवीन फोटो शेअर केला आहे. विशेष म्हणजे तेजस्विनीने शेअर केलेला फोटो अत्यंत मार्मिक आहे. स्मशानभूमीत मृतदेहांना दहन करणाऱ्या व्यक्तींच्या मनाची होणारी अवस्था तिने या फोटोतून मांडली आहे.

“प्लास्टिक मध्ये गुंडाळलेला देह तुझा माझ्या समोर येतो. अन माझ्या दोन वेळच्या जेवणाचा प्रवास सुरु होतो. संसर्ग होईल इतरांना म्हणून कुणी बाहेर आंदोलन करतो, मी मात्र असते सतत तुझ्या संपर्कात, माझा विचार कोण करतो ? पण मी जाणते सृष्टीसाठी निर्माण अन मुक्ती दोन्ही आढळ नियम आहेत आणि म्हणूनच तुला मुक्ती देण्यासाठी हात माझे सज्ज आहेत…”, अशी कॅप्शन तेजस्विनीने या फोटोला दिली आहे.

 

View this post on Instagram

 

अष्टमी . . प्लास्टिक मध्ये गुंडाळलेला देह तुझा माझ्या समोर येतो अन माझ्या दोन वेळच्या जेवणाचा प्रवास सुरु होतो. संसर्ग होईल इतरांना म्हणून कुणी बाहेर आंदोलन करतो, मी मात्र असते सतत तुझ्या संपर्कात, माझा विचार कोण करतो ? पण मी जाणते सृष्टीसाठी निर्माण अन मुक्ती दोन्ही आढळ नियम आहेत आणि म्हणूनच तुला मुक्ती देण्यासाठी हात माझे सज्ज आहेत. Design & Illustration : @indian_illustrator Photographer : @vivianpullan Writer : @rjadhishh_live Concept & Director : @dhairya_insta_ . . #navratri2020 #devi #देवमाणसं #दैवीकर्म #स्मशानभूमी #devbarekaro #coronawarriors #thankyou #cremators #crematory #dome #unsungheroes #mortuary #funerals #tejaswwini #gratitude #tribute #nageshwaghmare

A post shared by Tejaswwini (@tejaswini_pandit) on

दरम्यान, यापूर्वी तेजस्विनीने देवीच्या रुपातील सात वेगवेगळे फोटो शेअर केल आहेत. या प्रत्येक फोटोमधून तिने मुंबई पोलीस, डॉक्टर, सफाई कर्मचारी मुक्या प्राण्यांसाठी झटणाऱ्या व्यक्ती, रुग्णवाहिका चालक आणि सिमेवर लढणारे जवान यांचे आभार मानले आहेत.