News Flash

‘समजेल का माझी ही रुग्णसेवा ?’; तेजस्विनीने मानले रुग्णसेवकांचे आभार

पाहा, तेजस्विनीची नवरात्री स्पेशल पोस्ट

अभिनेत्री तेजस्विनी पंडितने आज पुन्हा एकदा देवीच्या रुपातील नवा फोटो शेअर करत रुग्णसेवा करणाऱ्यांचे आभार मानले आहेत. गेल्या काही दिवसांपासून तेजस्विनी देवीच्या रुपातील वेगवेगळे फोटो शेअर करत करोना काळात लढणाऱ्या लढवैय्याचे आभार मानत आहे. त्यातच आज नवरात्रीच्या सहाव्या दिवशी तिने रुग्णसेवा करणाऱ्या रुग्णवाहिनी चालकांचे आभार मानले आहेत.

”नाही मिळत आशिर्वाद मजला, नाही मिळत आभार…तुझ्या सुखी कुटुंबात माझा प्रवेश, जणू दु:खांचा प्रहार…बोचऱ्या नजरा असंख्य,अस्वस्थ नकोश्या जाणिवा. दुखावलेल्या लेकरांना,समजेल का माझी ही रुग्णसेवा ?”, असं कॅप्शन तेजस्विनीने या फोटोला दिलं आहे.

 

View this post on Instagram

 

षष्ठी . . नाही मिळत आशिर्वाद मजला, नाही मिळत आभार… तुझ्या सुखी कुटुंबात माझा प्रवेश, जणू दु:खांचा प्रहार… बोचऱ्या नजरा असंख्य,अस्वस्थ नकोश्या जाणिवा दुखावलेल्या लेकरांना,समजेल का माझी ही रुग्णसेवा ? Design & Illustration : @indian_illustrator Photographer : @vivianpullan Writer : @rjadhishh_live Concept & Director : @dhairya_insta_ . . #navratri2020 #devi #देवमाणसं #दैवीकर्म #रुग्णवाहिका #devbarekaro #coronawarriors #thankyou #ambulance #ambulancepersonnel #EMS #emergencyservices #paramedics #nationalnetworkofemergencyservices #tejaswwini #gratitude #tribute

A post shared by Tejaswwini (@tejaswini_pandit) on

दरम्यान, यापूर्वी तेजस्विनीने देवीच्या रुपातील पाच वेगवेगळे फोटो शेअर केल आहेत. या प्रत्येक फोटोमधून तिने मुंबई पोलीस, डॉक्टर, सफाई कर्मचारी आणि मुक्या प्राण्यांसाठी झटणाऱ्या व्यक्तींचे आभार मानले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 22, 2020 11:15 am

Web Title: marathi actress tejaswini pandit navratri special photoshoot day 6 ssj 93
टॅग : Navratri
Next Stories
1 ‘सुशांतला इतक्या सहज विसरलीस?’; ‘या’ व्हिडिओमुळे अंकिता झाली ट्रोल
2 सुशांतच्या मृत्यूवर हृतिक रोशनच्या आईची पोस्ट; सोशल मीडियावर चर्चांना उधाण
3 “पैसा, प्रेम सगळंच गमावलं होतं”; जेव्हा परिणीतीने केला होता नैराश्याबाबत खुलासा
Just Now!
X