22 October 2020

News Flash

‘वाटेवरती कर्तव्य अन माणुसकीची कावड माझ्या हाती’; तेजस्विनीने मानले मुंबई पोलिसांचे आभार

तेजस्विनीने मानले मुंबई पोलिसांचे आभार

नागरिकांच्या सेवेसाठी त्यांच्या सुरक्षेसाठी अहोरात्रं झटणाऱ्या पोलिसांविषयी काही वेगळं सांगण्याचं गरज नाही. त्यांचं कार्य, त्यांचा त्याग साऱ्यांनाच ठावूक आहे. कोणत्याही सणासुदीच्या दिवशी घरी न राहता नागरिकांच्या सुरक्षेसाठी पोलीस कायम तत्परत असतात. याच पोलिसांना नवरात्रीनिमित्ताने अभिनेत्री तेजस्विनी पंडित हिने सलाम केला आहे.

नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये तेजस्विनी समाजातील प्रत्येक घटनेवर,मुद्द्यावर व्यक्त होत असते. यावेळी तिने करोना काळात नागरिकांसाठी दिवसरात्र झटणाऱ्या मुंबई पोलिसांचे आभार मानले आहेत.


तेजस्विनीने पोलिसांच्या वेशातील एक फोटो शेअर केला आहे. यामध्ये देवी पोलिसांच्या रुपात समाजातील गरजू, वयस्क व्यक्तींची मदत करताना दिसत आहे. त्यामुळे समाजासाठी कायम लढणाऱ्या पोलिसांमध्ये देवाचंच एक रुप आहे असं तिने यातून सांगण्याचा प्रयत्न केला आहे.

“सद्रक्षणाय खलनिग्रहणायच्या वाटेवरती कर्तव्य अन माणुसकीची कावड माझ्या हाती. तू नाहीस असहाय माते ! हात माझा सदैव तुझ्या हाती सदैव तुझ्या साठी….”, असं कॅप्शन तिने या फोटोला दिलं आहे.

दरम्यान, काल नवरात्रीच्या पहिल्या दिवशी तेजस्विनीने डॉक्टरांच्या कार्याला सलाम केला होता. तिने डॉक्टरांच्या रुपात देवीचा एक फोटो शेअर केला होता. तेजस्विनी दरवर्षी नवरात्रीमध्ये अनोख्या पद्धतीने देवीच्या वेशातील फोटो शेअर करत असते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 18, 2020 12:00 pm

Web Title: marathi actress tejaswini pandit navratri special photshoot day 2 ssj 93
Next Stories
1 अंगदबरोबर असलेली महिला आहे तरी कोण? नेहा झाली चिंतातूर
2 अनुरागच्या वर्तनाविषयी इरफान पठाणला सांगितलं होतं, पायलचा आणखी एक खुलासा
3 ‘धर्मांधता व अज्ञान कायमच सोबत राहतात’; शिक्षकाच्या शिरच्छेद प्रकरणी जिशान अय्यूबनं व्यक्त केली खंत
Just Now!
X