30 November 2020

News Flash

कोठारेंची जलपरी! उर्मिलानं शेअर केला ‘जिजा’चा खास व्हिडीओ

स्विमिंग करण्यात जिजा दंग; पाहा उर्मिलाने शेअर केलेला खास व्हिडीओ

मराठी कलाविश्वातील प्रसिद्ध जोडी म्हणजे आदिनाथ आणि उर्मिला कोठारे. या दोघांप्रमाणेच त्यांची लेक जिजादेखील तितकीच लोकप्रिय आहे. त्यामुळे बऱ्याच वेळा सोशल मीडियावर जिजाचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असतात. यामध्येच सध्या जिजाचा आई-बाबांसोबतचा स्विमिंग करतानाचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.

नुकताच जागतिक कन्या दिन झाला. या दिवसाचं निमित्त साधत उर्मिलाने तिच्या लाडक्या लेकीला म्हणजेच जिजाला खास पद्धतीने शुभेच्छा दिल्या आहेत. उर्मिलाने इन्स्टाग्रामवर जिजाचा एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये जिजा तिच्या आई-बाबांसोबत पाण्यात मनसोक्तपणे पोहताना दिसत आहे.

दरम्यान, सध्या सोशल मीडियावर जिजाचा हा गोड व्हिडीओ व्हायरल होत असून अनेकांनी त्यावर कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. उर्मिला सोशल मीडियावर सक्रीय असून ती अनेकदा जिजाचे फोटो, व्हिडीओ शेअर करत असते. त्यामुळे सध्या जिजा मराठी कलाविश्वातील लोकप्रिय स्टारकिड असल्याचं दिसून येतं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 29, 2020 2:44 pm

Web Title: marathi actress urmila kothare share jiza swimming video ssj 93
Next Stories
1 रेस्तराँमध्ये लावले ‘बाहुबली’, ‘राधेश्याम’चे पोस्टर; चाहत्याकडून प्रभासला खास भेट
2 त्या फोटोवरुन ट्रोल करणाऱ्यांवर अभिनेत्री संतापली; दिली कायदेशीर कारवाईची धमकी
3 … म्हणून सायरा बानो यांनी केलं पाकिस्तान सरकारचं कौतुक
Just Now!
X