News Flash

‘या’ अभिनेत्रीची मराठी बिग बॉसमध्ये होणार वाईल्ड कार्ड एण्ट्री

या घरात आता कोणते नवे नाट्य रंगणार हे पाहणे खऱ्या अर्थाने उत्सुकतेचे असणार आहे.

मराठी बिग बॉसबद्दल सध्या जोरदार चर्चा सुरु असल्याचे चित्र आहे. या स्पर्धकांना दिले जाणारे वेगवेगळे टास्क आणि ते टास्क पूर्ण करताना त्यांची उडणारी तारांबळ, भांडणं यांमुळे प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन होत आहे. कुटुंबातील सर्वजण मिळून न चुकता हा कार्यक्रम पाहत असल्याचे घरोघरी पाहायला मिळते. आता बिग बॉसच्या या घरातील दोन गटांमध्ये जुंपली असतानाच एका नव्या सदस्याची या घरात एन्ट्री होणार आहे. आता ही एन्ट्री नेमकी कोणात्या अभिनेता किंवा अभिनेत्रीची होणार याबाबत मागच्या काही दिवसांपासून अंदाज बांधले जात आहेत. अखेर त्यावर पडदा पडणार असून त्या अभिनेत्रीचे नाव समोर आले आहे. त्यामुळे या घरात आता कोणते नवे नाट्य रंगणार हे पाहणे खऱ्या अर्थाने उत्सुकतेचे असणार आहे.

प्रथमेश परब, देवदत्त नागे, मानसी नाईक अशी अनेक नावे या एन्ट्रीसाठी चर्चेत होती. पण त्या सगळ्या नावांना मागे टाकत छोट्या पडद्यावरच्या ‘आक्कासाहेब’ बिग बॉसच्या घरात दाखल होणार आहेत. हर्षदा खानविलकर यांनी आपली आक्कासाहेब ही भूमिका खूप गाजवली होती. आता त्याच अंदाजात हर्षदा खानविलकर ‘बिग बॉस मराठी’च्या पहिल्या पर्वात दाखल होणार आहेत. त्यांच्या एन्ट्रीमुळे सध्याच्या घडामोडींमध्ये ट्विस्ट येणार हे नक्की असले तरी त्यांचा हा अंदाज प्रेक्षकांना किती भावतो ते पाहणे महत्त्वाचे आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 17, 2018 4:33 pm

Web Title: marathi big boss wild card entry of harshada khanwilkar
Next Stories
1 आता ‘कॉमेडीक्वीन’ दिसणार वेगळ्या रुपात
2 आराध्याला ओठांवर किस करतानाचा फोटो शेअर केल्यामुळे ऐश्वर्यावर शेलक्या शब्दांत टीका
3 आता एका क्लिकवर बदलता येणार कपड्यांचा रंग!
Just Now!
X