नागराज मंजुळेचा मराठीतील प्रसिद्ध ब्लॉकबस्टर चित्रपट ‘सैराट’वर लवकरच हिंदी मालिका येणार अशा चर्चा आहेत. रिंकू राजगुरू, आकाश ठोसर यांची प्रमुख भूमिका असलेल्या ‘सैराट’नं प्रेक्षकांना अक्षरश: वेड लावलं होतं. चित्रपटाची कथा, त्यातल्या गाण्यानं सोशल मीडियावर धुमाकूळ घातला होता. याच चित्रपटाचा हिंदीत रिमेकही आला होता. या रिमेकमधून श्रीदेवींची मुलगी जान्हवी कपूर आणि इशान खट्टरनं बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. आता या चित्रपटावर हिंदीत मालिका येणार असल्याचं वृत्त ‘बॉलिवूड लाइफ’नं दिलं आहे.

हिंदी मालिकेतील प्रसिद्ध चेहरा कमल नारायण राजवंशी या मालिकेत खलनायकाच्या भूमिकेत दिसतील असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. तर मालिकेतील मुख्य अभिनेत्री म्हणून एखाद्या नवोदीत अभिनेत्रीची निवड केली जाईल असंही म्हटलं जात आहे. अद्यापही या संबधीची अधिकृत घोषणा व्हायची बाकी आहे.

drishyam-hollywood-remake
‘दृश्यम’बद्दल मोठी अपडेट समोर; कोरीअन रिमेकनंतर आता चित्रपटाचा बनणार आता हॉलिवूडमध्ये रिमेक
marathi actress Amruta Subhash and sandesh kulkarni Love story Entdc
पहिल्या भेटीतलं प्रेम, १७व्या वर्षी लग्नाची मागणी अन् मूल होऊ न देण्याचा निर्णय; वाचा अमृता सुभाषची फिल्मी लव्हस्टोरी
actor shreyas talpade debut in south indian movie
बॉलीवूड गाजवल्यानंतर आता मराठमोळा श्रेयस तळपदे करणार दाक्षिणात्य चित्रपटात पदार्पण, म्हणाला…
aamir-khan2
ठरलं! ‘या’ चित्रपटातून आमिर खान करणार दमदार कमबॅक; प्रदर्शनाबद्दल मिस्टर परफेक्शनिस्टचा खुलासा

२०१६ साठी ‘सैराट’ प्रदर्शित झाला. या चित्रपटामुळे रातारोत रिंकू राजगुरू आकाश ठोसर लोकप्रिय झाले. मराठी चित्रपटाचे अनेक रेकॉर्ड या चित्रपटानं मोडले होते. फक्त मराठी प्रेक्षकांनाच नाही तर बॉलिवूडलाही या चित्रपटाची भुरळ पडली . त्यानंतर २०१८ मध्ये ‘धडक’ हा सैराटचा हिंदी रिमेक आला. मात्र मराठी ‘सैराट’ इतकी प्रसिद्धी ‘धडक’ला लाभली नाही. जर ‘सैराट’वर  हिंदी मालिका आली तर तिला मिळणारा प्रतिसाद कसा असेल हे पाहण्यासारखं ठरेल.