मराठी बॉक्स क्रिकेट लीग सिझन 3 मधील  “डॅशिंग मुंबई” संघाचा दमदार जर्सी लॉन्च सोहळा मुंबईतील एका शानदार हॉटेल मध्ये बुधवारी पार पडला. या कार्यक्रमास टीम चे मुंबई फ्रंचैजि मालक प्रथमेश कोळंंबकर, प्रतिक जाधव आणि गौरांग खानविलकर यांच्या सोबत टिमचे कॅप्टन संगीतकार अजित परब, निर्माता जितेंद्र ठाकरे, अभिनेता सुयश टिळक, माधव देवचक्के , सर्वेश परब,सिद्धांत मुळे अभिनेत्री दीप्ती देवी या प्रमुख टीम मेंबर समवेत विशेष अतिथि म्हणून उद्योजक व मनसे चे युवा नेते आदित्य शिरोडकर, कलानिधी चे सरचिटणीस सुशांत शेलार आदि मान्यवर उपस्थित होते.
box-cricket-02
आदित्य शिरोडकर यांनी डैशिंग मुंबई टीम ला विजयासाठी शुभेच्छा दिल्या. तसेच त्यानी या उपक्रमाचे देखील कौतुक केले. जितेंद्र ठाकरे यांनी मराठी बॉक्स क्रिकेट लीग ज्यांचा मार्गदर्शनामुळे प्रत्यक्षात अवतरली असे महाराष्ट्र कलानिधी चे संस्थापक आमदार नितेशजी राणे यांचे व सर्व कलाकारांना एकत्र घेऊन येणाऱ्या सुशांत शेलार यांचे विशेष आभार मानले. टीम चे कॅप्टन अजित परब यांनी शिवाजी राजे भोसले बोलतोय चित्रपटातील ओ राजे..   हे गाणे एकवून टीम ला प्रोत्साहित केले. गतवर्षी उपांत्य फेरी पर्यंत पोहोचलेली डॅशिंग मुंबई टीम यावर्षी अंतिम’फेरीत पोहचते का याबाबत उत्सुकता आहे.
यंदा  ४ ते ६ मे दरम्यान कोल्हापूरच्या शाहू स्टेडीयम येथे मराठी बॉक्स क्रिकेट लीग सीजन ३ चे सामने पहिल्यांदाच प्रेक्षकांच्या उपस्थितीत खेळले जाणार आहेत.