News Flash

‘फिटनेस गुरू’च्या वाढदिवसाला पोहचले सेलिब्रिटी शिष्य

प्रत्येक शिष्याच्या आयुष्यात गुरुचे स्थान अग्रस्थानी असते.

चित्रपटाच्या क्षेत्रातील नामवंतांची त्यांच्याकडे रांग लागली आणि परुळेकर सेलिब्रिटी ट्रेनर म्हणून ओळखले जाऊ लागले.

प्रत्येक शिष्याच्या आयुष्यात गुरुचे स्थान अग्रस्थानी असते. आपल्याला घडवण्यात आई-वडिलांसोबतच गुरुचा मोठा वाटा असतो. मग, तो गुरु कोणत्याही रुपात येऊ शकतो. शिक्षक, मित्र, मैत्रिण किंवा व्यायाम प्रशिक्षक.. मराठी चित्रपटसृष्टीत सध्या आपण फिट असे कलाकार पाहतोय. त्यांच्या या फिट असण्यामागे आणि योग्य अशी शरीरयष्टी कमवण्यामागे व्यायाम प्रशिक्षक शैलेश परुळेकर यांचा मोलाचा वाटा आहे. व्यायाम आणि क्रीडा या दोन्ही  क्षेत्रात शैलेश परुळेकर हे नाव आधीही परिचित होते पण सामान्यांना ठाऊक झाले ते नटरंगमध्ये पीळदार शरीरयष्टीचा अतुल कुलकर्णी पाहिल्यानंतर. त्यानंतर तर चित्रपटाच्या क्षेत्रातील नामवंतांची त्यांच्याकडे रांग लागली आणि परुळेकर सेलिब्रिटी ट्रेनर म्हणून ओळखले जाऊ लागले. आज ‘फिटनेस गुरू’ म्हणून शैलेश परुळेकर हे सुपरिचित आहेत.

माझ्या नातेवाईकांना वाटलं की मी गरोदर आहे- प्रिया बापट

हा आहे मराठीतील ‘मस्क्युलर’ हिरो…

नुकताच परुळेकर यांचा ५० वा वाढदिवस झाला. आपल्या गुरुचा वाढदिवस साजरा करण्यासाठी अनेक मराठी कलाकारांनी हजेरी लावली होती. प्रिया बापट, उमेश कामत, सुबोध भावे, जिंतेद्र जोशी, अनिकेत विश्वासराव, अतुल कुलकर्णी, प्रतिक्षा लोणकर, अमृता सुभाष, संदेश कुलकर्णी, गितांजली कुलकर्णी, पल्लवी सुभाष आदी कलाकार मंडळी त्यांच्या वाढदिवसाला उपस्थित होते. या सर्वांच्या फिटनेसमागे शैलेश परुळेकर यांचा हात आहे. परुळेकरांच्या सर्व सेलिब्रिटी शिष्यांनी आपल्या गुरुला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत त्यांच्यासोबतचा ग्रुप फोटो सोशल मिडीयावर शेअर केला आहे.

काही दिवसांपूर्वीच प्रियाचा ‘वजनदार’ चित्रपट आला. या चित्रपटासाठी प्रियाने तब्बल १५ किलो वजन वाढवले होते. त्यानंतर पुन्हा ‘स्लिम ट्रीम’ झालेली प्रिया आपल्याला पाहावयास मिळाली. तिने ‘बिफोर आफ्टर’ शेअर केलेला फोटो पाहून सर्वांना तिने जीममध्ये किती घाम गाळला असेल याचा अंदाज येईलच. तसेच, प्रियाचा पती आणि अभिनेता उमेश कामत यानेही त्याच्या इन्स्ट्राग्राम अकाउन्टरवर पिळदार शरीरयष्टीतील फोटो शेअर केले आहेत. उमेशचा हा मेकओव्हर तर सर्वांनाच आश्चर्याचा धक्का देणारा आहे.

जिद्द सोडू नका..

१७ एप्रिल १९९९ साली त्यांनी कांदिवली येथे परुळेकर जिम्सची सुरुवात केली. पहिल्यांदा कांदिवली, मग गोरेगाव आता मीरारोड अशा परुळेकर्सच्या शाखा सुरू झाल्या आहेत. खरेतर मुंबईबाहेरही पुणे आदी शहरांतून त्यांच्याकडे शाखा सुरू करण्याची मागणी होते आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 22, 2016 11:15 am

Web Title: marathi celebrity celebrated fitness trainer shailesh parulekars 50th birthday
Next Stories
1 ‘त्या’ अफवांवर अभिषेकने दिला पू्र्णविराम
2 ‘तुमच्या प्रेमावरच मी उभी आहे’
3 मालिकेच्या चित्रीकरणासाठी नागाची हेळसांड!
Just Now!
X