24 February 2021

News Flash

मराठी चित्रपटसृष्टी प्रगतीपथावर- अमिताभ बच्चन

बॉलीवूड मेगास्टार अमिताभ बच्चन आगामी मराठी चित्रपट 'ढोलकी'चा फर्स्ट लूकच्या प्रदर्शन कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

| July 31, 2015 11:55 am

बॉलीवूड मेगास्टार अमिताभ बच्चन आगामी मराठी चित्रपट ‘ढोलकी’चा फर्स्ट लूक प्रदर्शित करतेवेळीप्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. अमिताभ यांच्या हस्ते ‘ढोलकी’ चित्रपटाच्या गाण्यांचे अनावरण करण्यात आले. यावेळी बोलत असताना अमिताभ यांनी मराठी चित्रपटसृष्टीचे कौतुक करीत मराठी सिनेमा आता प्रगतीपथावर असल्याचे म्हटले. मराठी चित्रपटसृष्टीत सध्या चांगल्या कथा पाहायला मिळत आहेत. मराठी सिनेमा दिवसेंदिवस प्रगती करीत आहे यात शंका नाही, असे अमिताभ यांनी सांगितले. ‘ढोलकी’ चित्रपटाच्या टीमला यावेळी अमिताभ यांनी शुभेच्छा देखील दिल्या.
मदन पोरवाल, शिरिष शेट्टी यांची निर्मिती असलेल्या ढोलकी या चित्रपटाचे दिग्दर्शक राजू देसाई आणि विशाल देसाई यांनी केले आहे. चित्रपटात अभिनेता सिद्धार्थ जाधव, काशमिरा कुलकर्णी, सय्याजीराव शिंदे यांच्या भूमिका आहेत. येत्या दिवाळीत ‘ढोलकी’ हा चित्रपट प्रदर्शित होण्याची अटकळ बांधली जात आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 31, 2015 11:55 am

Web Title: marathi cinema is growing amitabh bachchan
Next Stories
1 पाहा ‘फॅण्टम’मधील ‘अफगान जिलेबी’ गाणे
2 सौंदर्य प्रसाधनांच्या जाहिरातीत काम करणार नाही- अनुष्का शर्मा
3 २०१६ची दिवाळी; चित्रपट प्रदर्शनाची भाऊगर्दी
Just Now!
X