09 April 2020

News Flash

‘गो करोनिया… गो गो करोनिया’, कुशल बद्रिकेचे भन्नाट गाणे पाहिलेत का?

त्याने गँग्स ऑफ वासेपुर चित्रपटातील ओ वुमनिया गाण्यावर हे गाणे तयार केले आहे

जगभरात ३,८०,००० लोकांना करोनाची लागण झाली असून तब्बल १६,००० जणांचे बळी करोनाने घेतले आहेत. सगळ्यात जास्त म्हणजे जवळपास ५,००० जणांचे बळी तर एकट्या इटलीत गेले आहेत. भारतात करोना झालेल्या लोकांची संख्या ५०३ वर पोहचली आहे. तर महाराष्ट्रात ही संख्या १०१ वर पोहचली आहे. संसर्गातून पसणाऱ्या या कनोचा वाढता धोका पाहता भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २२ मार्चला ‘जनता कर्फ्यू’ घोषीत केला होता. त्याचबरोबर आता महाराष्ट्रात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे चित्रपट आणि मालिकांचे चित्रीकरण देखील थांबवण्यात आले आहे.

२४ तास चित्रीकरणामध्ये व्यग्र असलेले कलाकार आता मिळालेल्या मोकळ्या वेळात काय करत असतील असा प्रश्न अनेकांना पडला असेलच. ‘चला हवा येऊ या’ या कार्यक्रमातील विनोदवीर कुशल बद्रिके सध्या आपल्या कुटुंबीयांसोबत वेळ घालवताना दिसत आहे. तसेच त्याने त्याच्या क्रिएटीव्ह कामाचा भन्नाट व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.

कुशलने नुकताच त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये त्याने ‘गँग्स ऑफ वासेपुर’ चित्रपटातील ‘ओ वुमनिया’ या गाण्यावर करोनाचे गाणे तयार केले आहे. त्याने या गाण्यात ‘गो करोनिया… गो गो करोनिया’ असे म्हटले असून लोकांनी स्वत:ची काळजी कशी घ्यावी हे सांगितले आहे.

हा व्हिडीओ शेअर करत कुशले ‘घरीच राहून तुमच्या कुटूंबासोबत वेळ काढा, आणी काळजी घ्या. घरी काहीतरी creative करा आणी मला नक्की TAG करा. माझ्या कुटूंबाकडून थोडं मनोरंजन आणी थोडं प्रबोधन’ असे कॅप्शन दिले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 24, 2020 10:54 am

Web Title: marathi comedy actor kushal badrike sing go coronia go go coroniaa avb 95
Next Stories
1 Coronavirus : घरात राहून ‘या’ कामात रमतीये कतरिना; पाहा तिचा हटके व्हिडीओ
2 दुसऱ्यांदा कनिका कपूरचा करोना व्हायरसच्या चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह
3 ‘या’ तीन अभिनेत्रींसोबत इमरान हाश्मी कधीही देणार नाही किसिंग सीन, कारण…
Just Now!
X