News Flash

मराठी विनोदी कलाकारांचा ‘एप्रिल फुल’ धमाका

प्रेक्षकांना खळखळून हसवणार

ऋषिकेश जोशी, किशोर कदम, भारत गणेशपुरे

एप्रिल महिन्याची सुरुवात म्हटलं की ‘एप्रिल फुल’ला उधाण येतं. एप्रिलच्या कडक उन्हाळ्यात हास्याचा पाऊस पाडणाऱ्या या ‘एप्रिल फुल’ची मज्जा प्रत्येकजण घेत असतो. हीच मज्जा घेऊन मराठीतील काही दिग्गज कलाकार खास एप्रिल फुलच्या निमित्ताने लोकांसमोर येत आहेत.

माणसांना रडवणे खूप सोपे असते, मात्र हसवणे त्याहून कठीण. म्हणूनच तर प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर हास्य येण्यासाठी विनोदवीरांना बरीच मेहनत घ्यावी लागते. मायबाप प्रेक्षकांच्या एका हसूसाठी आपल्या दर्जेदार अभिनयाद्वारे विनोदाचा स्तर उंचावणारे असे अनेक दिग्गज कलाकार आपल्याला मराठीत पाहायला मिळतात. अशा या सर्व भन्नाट विनोदवीरांचा बंपर पॅकेज असलेला ‘वाघेऱ्या’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांसमोर येत आहे. गौरमा मीडिया अँड एंटरटेंटमेंट प्रा. लि. आणि वसुधा फिल्म प्रॉडक्शन निर्मित, तसेच सुप्रीम मोशन पिक्चर्सचे लालासाहेब शिंदे आणि राजेंद्र शिंदे यांची प्रस्तुती असलेल्या या सिनेमाचे लेखन आणि दिग्दर्शक समीर आशा पाटील यांनी केले आहे.

धम्माल विनोदीपट असलेल्या या चित्रपटात किशोर कदम, भारत गणेशपुरे , हृषिकेश जोशी, सुहास पळशीकर, नंदकिशोर चौघुले, लीना भागवत आणि छाया कदम यांसारख्या अनुभवी आणि मातब्बर कलाकारांच्या अभिनयाची जुगलबंदी प्रेक्षकांना पाहता येणार आहे. उन्हाळ्याच्या सुट्टीत प्रेक्षकांना हास्याची चटकदार मेजवानी देण्यासाठी येत असलेल्या या सिनेमाचे राहुल शिंदे आणि केतन माडीवाले निर्माते आहेत.

वाचा : बिग बींनी पुन्हा एकदा धरली दक्षिणेची वाट

नाटक, मालिका आणि चित्रपटाद्वारे प्रेक्षकांना खळखळून हसवणारे हे विनोदवीर प्रथमच ‘वाघेऱ्या’ या सिनेमाच्या निमित्ताने एकत्र आले असल्यामुळे, या सिनेमाद्वारे विनोदाचा वारू चौफेर उधळणार हे निश्चित.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 28, 2018 5:59 pm

Web Title: marathi comedy actors new movie vagherya april fool bharat ganeshpure kishore kadam
Next Stories
1 ‘गोपी बहू’ला लाखोंचा गंडा
2 तीस वर्षापूर्वीचं चाळीतलं घर पाहून इमोशनल झाला जॅकीदादा
3 VIDEO : राजकुमार राव, श्रद्धा कपूर ‘दिल से’ गातात तेव्हा
Just Now!
X