05 March 2021

News Flash

Video : क्वारंटाइनमध्ये स्वतःला फिट ठेवण्यासाठी ‘महागुरुं’ची कसरत

सोशल मीडियावर पोस्ट केला व्हिडीओ

करोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे सध्या देशभरात खडतर परिस्थिती आहे. परिस्थितीचा सामना करण्यासाठी केंद्र सरकारने २१ दिवस लॉकडाऊनची घोषणा केली आहे. या काळात अनेक लोकं होम क्वारंटाइन झालेली आहेत. तसेच करोनाच्या संशयित रुग्णांनाही सरकार क्वारंटाइन होण्याचा सल्ला देतंय. अनेक सेलिब्रेटी, खेळाडू या काळात आपल्या घरामध्ये थांबून परिवारासोबत वेळ घालवत आहेत.

मराठी चित्रपटसृष्टीचे ज्येष्ठ अभिनेते आणि दिग्दर्शक सचिन पिळगावकर सध्याच्या काळात स्वतःला फिट ठेवण्यासाठी किक बॉक्सिंग करत आहेत. आपल्या या वर्कआऊटचा व्हिडीओ सचिन पिळगावकर यांनी आपल्या फेसबूक अकाऊंटवर पोस्ट केला आहे.

दरम्यान, करोनाविरुद्धच्या लढ्यात भारतानं जे नियोजन केलं आहे, त्याचं सर्व स्तरातून कौतुक करण्यात आलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रविवारी दिवे लावण्याच्या आवाहनालाही मोठा प्रतिसाद देत जनतेनं यात सहभाग घेतला. प्रत्येक नागरिक आज स्वत:ला आणि देशाला वाचवण्यासाठी लढतोय. प्रत्येक भारतीय आज एकत्र, एकसंध आहे. करोनाची लढाई ही मोठी लढाई आहे. यात आपल्याला जिंकायचं आहे, लढून पुढे जायचं आहे असंही मोदींनी स्पष्ट केलं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 6, 2020 3:28 pm

Web Title: marathi film actor and director sachin pilgaonkar share his kick boxing video during home quarantine period psd 91
टॅग : Coronavirus
Next Stories
1 Ek thi begum : ‘उस बादशाह को मात ये बेगम देगी’; ट्रेलर प्रदर्शित
2 ‘सोनाक्षीसारख्या लोकांनी ‘रामायण’ पाहावं’; मुकेश खन्नांचा ‘दबंग गर्ल’ला टोमणा
3 ‘यांच्या हातातून फोन काढून घ्या’; चुकीचा फोटो शेअर केल्यामुळे बिग बी ट्रोल
Just Now!
X