20 October 2020

News Flash

‘टोटल हुबलाक’मध्ये मोनालिसाचा गावरान अंदाज!

यापूर्वी मोनालिसा सौ.शशी देवधर आणी परफ्युम या चित्रपटांमध्ये झळकली आहे

सध्याच्या काळात अनेक तरुण-तरुणी कलाविश्वामध्ये नशीब आजमावण्याचा प्रयत्न करत आहेत. विविध नाटक, मालिका यांच्या माध्यमातून नवनवीन चेहरे प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. त्यातलंच एक नाव म्हणजे मोनालिसा बागल. सौ. शशी देवधर या चित्रपटात बालकलाकाराची भूमिका साकारणारी ही चिमुकली आता लवकरच छोट्या पडद्यावर झळकणार आहे.

अभिनेत्री सई ताम्हणकर हिची मुख्य भूमिका असलेला. ‘सौ. शशी देवधर’ हा चित्रपट विशेष लोकप्रिय झाला होता. या चित्रपटात मोनालिसाने सईच्या बालपणीची भूमिका साकारली होती. मात्र आता ही चिमुकली मोठी झाली असून ती छोट्या पडद्यावर अभिनेत्री म्हणून झळकणार आहे. आगामी टोटल हुबलाक या मालिकेत ती मुख्य भूमिका साकारणार आहे.

‘सौ. शशी देवधर’ या चित्रपटापासून मोनालिसाच्या करिअरचा प्रवास सुरु झाला होता. तिने ‘प्रेम संकट’, ‘भोभाटा’, ‘ड्राय डे’ यासारख्या चित्रपटांमध्ये काम केलं आहे. अनेक वेळा ती ग्लॅमरस फोटो आणि अभिनय शैलीमुळे चर्चेत येत असते. मात्र यावेळी मालिकेत मुख्य भूमिका साकारत असल्यामुळे नव्याने तिची चर्चा रंगू लागली आहे.

दरम्यान, गेल्याच वर्षी ‘परफ्युम’ या चित्रपटातून ती प्रेक्षकांच्या भेटीस आली होती. प्रदीर्घ काळ चित्रपट केल्यानंतर तिने आता आपला मोर्चा टिव्ही मालिकेच्या प्रेक्षकांकडे वळवला असून ‘टोटल हुबलाक’ या नवीन विनोदी मालिकेतून तिने लॉकडाऊनमध्ये कंटाळलेल्या प्रेक्षकांचे मनोरंजन करण्याचा विडा उचलला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 22, 2020 6:13 pm

Web Title: marathi film actress monalisa bagal makes tv debut with total hublak ssj 93
Next Stories
1 सैफचं घराणेशाहीवर मोठं वक्तव्य म्हणाला, “होय हे खरं आहे की भारतात…”
2 ‘गँग्ज ऑफ वासेपूर’मधल्या एका प्रसंगाने माझं आयु्ष्यच बदलून गेलं-हुमा कुरेशी
3 Video : ‘कलाविश्वाचं आकर्षण नाही; पिठलं भाकरी खाऊनही समाधानी’
Just Now!
X