News Flash

संजय जाधव दुनियादारी करायला सज्ज; ‘या’ मालिकेच्या माध्यमातून छोट्या पडद्यावर पदार्पण

जाणून घ्या, संजय जाधवच्या भूमिकेविषयी

मराठी कलाविश्वातील नावाजलेलं नाव म्हणजे दिग्दर्शक संजय जाधव. आतापर्यंत संजय जाधव यांचे ‘दुनियादारी’,‘खारी बिस्कीट’, ‘लकी’, ‘प्यारवाली लव्ह स्टोरी’ असे अनेक चित्रपट सुपरहिट ठरले आहेत. त्यांच्या या चित्रपटांमुळे अनेक कलाकारांचं नशीब उजळलं आहे. विशेष म्हणजे रुपेरी पडदा गाजवणारे संजय जाधव यांचं लवकरच छोट्या पडद्यावर पदार्पण होणार आहे.

सध्या छोट्या पडद्यावर काय घडल त्या रात्री? ही मालिका चांगलीच चर्चिली जात आहे. याच मालिकेत संजय जाधव झळकणार आहेत. या मालिकेमध्ये ते अॅडव्होकेट विश्वजीत चंद्रा ही भूमिका साकारणार आहेत. विशेष म्हणजे विश्वजीत चंद्रा हे एसीपी रेवती बोरकर यांचे पती असून न्यायालयात ते एकमेकांच्या समोरासमोर येणार आहेत. विश्वजीत हे समाजातील प्रतिष्ठीत आणि श्रीमंत व्यक्ती असल्याचं दाखवण्यात आलं आहे.

आणखी वाचा- ‘द कपिल शर्मा शो’ होणार बंद; पत्नीसाठी कपिलने घेतला महत्त्वाचा निर्णय

दरम्यान, काय घडलं त्या रात्री ही मालिका कमी कालावधीत लोकप्रिय होताना दिसत आहे. या मालिकेत अभिनेत्री मानसी साळवी मुख्य भूमिकेत झळकली आहे. विशेष म्हणजे तब्बल १३ वर्षानंतर मानसीने मराठी मालिकांमध्ये पदार्पण केलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 29, 2021 2:00 pm

Web Title: marathi film director sanjay jadhav tv show kay ghadla tya ratri ssj 93
Next Stories
1 किंग खानने केला खतरनाक स्टंट; व्हिडीओ पाहुन तुमच्याही अंगावर येईल काटा
2 ‘तांडव’च्या वादावर शर्मिला टागोर यांनी सैफला दिला ‘हा’ सल्ला
3 ‘अर्णब की तांडव, सगळ्यात घातक कोण?’; दिग्दर्शकांचा थेट सवाल
Just Now!
X