22 September 2020

News Flash

‘ फुलराणी’ रुपेरी पडद्यावर

बालकवी यांच्या गाजलेल्या ‘फुलराणी’ या कवितेवरूनच या चित्रपटाचे शीर्षक घेण्यात आले आहे.

जॉर्ज बर्नाड शॉ या प्रतिभावान लेखकाच्या अनेक कलाकृतींची आजवर वेगवेगळी यशस्वी माध्यमांतरं झाली आहेत. त्यांच्या ‘पिग्मॅलिअन’ या गाजलेल्या नाटय़कृतीवर १९६४ साली आलेली ‘माय फेअर लेडी’ हा चित्रपट चांगलाच गाजला होता. आता याच ‘पिग्मॅलिअन’ कलाकृतीने प्रेरित होऊन ‘फुलराणी .. अविस्मरणीय प्रेमकहाणी’ हा चित्रपट मराठी रुपेरी पडद्यावर येऊ घातला आहे. ‘व्हॉट्सअ‍ॅप लग्न’ या यशस्वी चित्रपटानंतर दिग्दर्शक विश्वास जोशी ‘फुलराणी’ हा चित्रपट प्रेक्षकांसाठी घेऊन येणार आहेत. त्याचे उत्सुकता वाढवणारे पोस्टरही नुकतेच प्रकाशित करण्यात आले आहे.

या नव्या कलाकृतीचे लेखन विश्वास जोशी व गुरूठाकूर यांनी केले आहे. सर्वस्वी नव्या स्वरूपातील ‘फुलराणी’ प्रेक्षकांना या चित्रपटातून पहायला मिळणार आहे. चित्रपटाच्या कलाकारांची नावे अद्याप गुलदस्त्यात असली तरी प्रेमाचा अविस्मरणीय आविष्कार या चित्रपटाच्या निमित्ताने प्रेक्षकांना बघायला मिळेल, असा विश्वास दिग्दर्शक विश्वास जोशी व्यक्त करतात. बालकवी यांच्या गाजलेल्या ‘फुलराणी’ या कवितेवरूनच या चित्रपटाचे शीर्षक घेण्यात आले आहे. या कवितेला संगीतकार नीलेश मोहरीर नव्या स्वरूपात संगीतबद्ध करणार आहेत. फिनक्राफ्ट मिडिया अँड एन्टरटेन्मेंट प्रा.लि यांची प्रस्तुती असलेला हा चित्रपट प्रेक्षकांसाठी एक मेजवानी असेल हे नक्की. २०२० च्या अखेरीस या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात होईल आणि २०२१ मध्ये चित्रपट रुपेरी पडद्यावर येण्यासाठी सज्ज होईल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 9, 2020 1:10 am

Web Title: marathi film fulrani set to hit the screens zws 70
Next Stories
1 ‘झी टॉकीज’वर छत्रपती शिवाजी महाराजांची शौर्यगाथा
2 अभिनेता संजय दत्त लिलावती रुग्णालयात दाखल
3 हरयाणाच्या मुख्यमंत्र्यांनी घेतली सुशांतच्या कुटुंबीयांची भेट
Just Now!
X