20 February 2019

News Flash

पुरुषोत्तम बेर्डे, प्रशांत दामले यांना मराठी वाद्यवृंद निर्माता संघाचा पुरस्कार जाहीर

गेली चार वर्षे हा पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात येत आहे

पुरुषोत्तम बेर्डे, प्रशांत दामले

मराठी व्यावसायिक वाद्यवृंद निर्माता संघ (मुंबई) यांच्यातर्फे यंदाचा जीवन गौरव पुरस्कार ज्येष्ठ निर्माता- दिग्दर्शक पुरुषोत्तम बेर्डे यांना तर ज्येष्ठ अभिनेते प्रशांत दामले यांना विशेष कलागौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. माटुंग्याच्या यशवंत नाट्य मंदिरात १५ फेब्रुवारीला पार पडणाऱ्या एका सोहळ्यात पुरस्कार विजेत्यांना सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात येणार आहे. तसेच वाद्यवृंद क्षेत्रातील विविध पुरस्कार ही देण्यात येणार आहेत.

सरकार दरबारी नाट्य, सिनेमा, लोककला क्षेत्राला विविध पुरस्कार आणि मानसन्मान दिले जातात. पण, वाद्यवृंदातील कलाकार आजही उपेक्षित आहेत. अशा उपेक्षित निर्माता संघ सरकार दरबारी आपल्या कलेचाही सन्मान केला जावा म्हणून कलाकारांना सोबत घेऊन गेली चार वर्षे हा पुरस्कार सोहळा आयोजित करत आहे.

…तर नजरेने घायाळ करणारी प्रिया इतकी लोकप्रिय झालीच नसती

यंदाच्या वर्षी या निर्माता संघाने संदिप सातार्डेकर (निर्माता पुरस्कार), नरेंद्र बेडेकर (निवेदन), आबा जामसांडेकर (वादन), दिपाली विचारे (नृत्य) प्रभंजन मराठे (गायक), अंजली तळेकर (गायिका), जॉनी रावत (विनोदी), उत्तम शिंदे ( ध्वनी संयोजन), प्रविण गवळी (नेपथ्य), विजय राऊत (प्रकाश योजना) यांनाही पुरस्कार जाहीर केले आहेत.

वाचा : पुरुष कलाकारांनी कमी मानधन आकारावं- दीपिका पदुकोण

First Published on February 13, 2018 7:12 pm

Web Title: marathi film industry purushottam berde prashant damle awards