News Flash

‘ओली की सुकी’ सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित

दृष्टचक्रात अडकलेल्या मुलांच्या आयुष्यावर हा सिनेमा बेतला आहे

अनेकदा रस्त्यावर दंगा मस्ती करणारी मुले पाहिली की यांना काही संस्कार केले आहेत की नाही किंवा अशा मुलांना वाया गेलेली मुले असे बिरुद लावून समाज मोकळो होतो. पण ते असे का बनतात हे मात्र कोणीही तपासायला जात नाहीत. आता समाजानाचे वाया गेलेली मुले म्हणून धिक्कारुन दिल्यावर त्यांच्या मनातही ही भावना पक्की होते.

या मुलांचे प्रतिकूल ‘फॅमिली बॅकग्राऊंड’ त्यांच्या या वागणुकीला कारणीभूत ठरत असते. या दुष्टचक्रात अडकलेल्या मुलांमधूनच पुढे गुन्हेगार निर्माण होतात. या मुलांमध्ये बदल घडवायचा असेल तर आधी समाजाची मानसिकता बदलण्याची गरज आहे. या मुलांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी समाजाची मानसिकता ही महत्त्वाची असते. ‘ओली की सुकी’ या सिनेमाच्या माध्यमातून लहान वयात गुन्हेगारीच्या दुष्टचक्रात अडकलेल्या मुलांची कथा मांडण्यात आली आहे.

समाजाची मानसिकता बदलण्यासाठी सिनेमा हे प्रभावी माध्यम असल्याचे या सिनेमाचे लेखक आनंद गोखले यांना वाटते. नेमकी हाच प्रयत्न या सिनेमाच्या माध्यमातून केला असल्याचे त्यांनी म्हटले. ‘वस्तीतील वास्तव’ या धाग्यावर जरी हा सिनेमा बेतला असला तरी ते वास्तव कुठेही अंगावर न येता उलट प्रेक्षक, या सिनेमाशी आपोआप कनेक्ट होतील असा विश्वास लेखकाला आहे. तेजश्री प्रधान, भार्गवी चिरमुले, संजय खापरे, शर्वरी लोहोकरे यांच्या या सिनेमात महत्त्वाच्या भूमिका आहेत. तसेच या सिनेमाची पटकथा आणि दिग्दर्शन आनंद गोखले यांनी केले आहे तर वैभव उत्तमराव यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. हा सिनेमा येत्या १६ डिसेंबरला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 15, 2016 4:29 pm

Web Title: marathi film oli ki suki trailer released
Next Stories
1 पाहा- ‘पद्मावती’च्या रुपातील दीपिकाची पहिली झलक
2 सोनम आणि राधिका बनल्या आयकॉन ऑफ इंडिया
3 ‘वजह तुम हो’च्या अभिनेत्रीचे चित्रपटाच्या दिग्दर्शकासोबत डेटींग?
Just Now!
X