News Flash

नऊ किलो सोनं चोरणाऱ्या मराठी चित्रपट निर्मात्याला अटक

चोरीचे सोने हस्तगत करण्यासाठी गुन्हे शाखेकडून धडपड सुरू आहे

निर्माता अमोल लवाटे

मुंबई : सराफाने गाळण्यासाठी दिलेले सुमारे नऊ किलो कच्चे सोने घेऊन पसार झालेल्या चौघांना गुन्हे शाखेने मंगळवारी बेडय़ा ठोकल्या. यातील एक आरोपी चित्रपट निर्माता आहे. चोरीचे सोने हस्तगत करण्यासाठी गुन्हे शाखेकडून धडपड सुरू आहे.

‘वंटास’ या चित्रपटाचा निर्माता अमोल लवाटे याने दोन महिन्यांपूर्वी काळबादेवी परिसरात भाडय़ाने जागा घेत सोने गाळण्याचा कारखाना सुरू केला. बाजारपेठेतील काही व्यापाऱ्यांकडे जाऊन लवाटे आणि त्याच्या साथीदारांनी सोने गाळण्यासाठी द्यावे, अशी विनंती केली. यापैकी देवेंद्र बाफना या व्यापाऱ्याने लवाटेकडे सोने देण्यास सुरुवात केली.  २१ जुलैला बाफना यांनी लवाटेकडे सुमारे अडीच कोटी रुपये किमतीचे नऊ किलो कच्चे सोने दिले. मात्र या वेळेस लवाटे आणि त्याच्या तीन साथीदारांनी सोने घेऊन पोबारा केला. याप्रकरणी लोकमान्य टिळक मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला. पुढे तो गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला. पोलिसांनी आरोपींना मंगळवारी मानखुर्द परिसरातून अटक केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 2, 2018 12:03 pm

Web Title: marathi film producer amol lavate arrested for fleeing with rs 3 crore gold
Next Stories
1 बायोपिकमध्ये भूमिका साकारल्यानंतर अजूनही मानसिक तणावात – सनी लिओनी
2 प्रियांकाऐवजी कतरिनाचीच निवड ‘भारत’साठी योग्य होती कारण…..
3 ‘ललित २०५’मधून घेतला जाणार नात्यांमधील हरवलेल्या संवादाचा शोध
Just Now!
X