रेश्मा राईकवार

करोना महासाथीच्या संकटामुळे गेल्या वर्षापासून ५० ते ६० मराठी चित्रपटांचे प्रदर्शन रखडले असून निर्मात्यांची शंभर ते सव्वाशे कोटींची गुंतवणूक अडकू न पडली आहे.

गेल्यावर्षीपासून प्रदर्शनाच्या प्रतीक्षेत असलेल्या मराठी चित्रपट निर्मात्यांच्या अडचणींना सध्या पारावार उरलेला नाही. करोना टाळेबंदीमुळे बंद झालेली अनेक चित्रपटगृहे वर्ष उलटून गेले तरी पूर्ण क्षमतेने सुरू झालेली नाहीत. ५० टक्के  क्षमतेतच चित्रपटगृह चालवण्याचे आदेश असल्याने आर्थिक नुकसान टाळण्यासाठी चित्रपट प्रदर्शित करण्याचे धाडस निर्माते करू शकलेले नाहीत. गेल्या वर्षी काही मराठी चित्रपटांनी प्रदर्शनाच्या तारखा जाहीर के ल्या, प्रसिद्धी कार्यक्रमही सुरू केले. परंतु मार्चपासून टाळेबंदीमुळे चित्रपटगृहेही बंद ठेवावी लागल्याने या चित्रपटांचे प्रदर्शन रखडले.

मराठी चित्रपटांचा व्यवसाय ६० टक्के  एकपडदा चित्रपटगृहे आणि ४० टक्के  बहुपडदा चित्रपटगृहांवर अवलंबून आहे. मात्र त्यावेळी राज्यात अनेक एकपडदा चित्रपटगृहे सुरूच झाली नव्हती. अध्र्या क्षमतेत चित्रपटगृहे सुरू ठेवायची असल्याने उत्पन्नाला ५० टक्के  कात्री आधीच लागली होती, त्यात पुरेशी चित्रपटगृहेच नसल्याने तर १५ टक्के ही प्रेक्षक चित्रपटाला मिळाले नसते. त्यामुळे आम्ही प्रदर्शन पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला, अशी माहिती ‘डार्लिंग’या चित्रपटाचे निर्माते अजय ठाकू र यांनी दिली. प्रथमेश परबची मुख्य भूमिका असलेला हा चित्रपट गेल्यावर्षी जूनमध्ये प्रदर्शित करण्याचा निर्मात्यांचा मानस होता. दोन कोटींपेक्षा अधिक खर्च असलेल्या या चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी ५० लाख रुपये आधीच खर्च झाले आहेत. आता दीर्घ काळानंतर त्याच्या प्रसिद्धीसाठी पुन्हा तेवढाच खर्च करावा लागणार आहे. आमचे जवळपास ७० टक्के  नुकसान झाले आहे, असे ठाकू र यांनी सांगितले.

‘ईमेल फीमेल’ या चित्रपटासाठीही दोनदा प्रदर्शनाच्या तारखा जाहीर झाल्या, प्रसिद्धीही झाली आणि दोन्ही वेळेला चित्रपटाचे प्रदर्शन फसले. चित्रपट तयार झाल्यापासून उत्पन्न काहीच नाही, केवळ खर्चाचा आकडा वाढतो आहे, असे या चित्रपटाचे निर्माते मनीष पटेल यांनी सांगितले.

कर्जाचा वाढता डोंगर…

अनेकदा चित्रपट करताना व्याजावर किं वा उधारीवर अनेक गोष्टी घेतल्या जातात. चित्रपट प्रदर्शनच रखडल्याने व्याज वाढत चालले आहे. जेव्हा चित्रपट प्रदर्शित होईल तेव्हा हा खर्च किती वाढेल हाही प्रशद्ब्रा सतावत असल्याचे ‘पूरषा’ या चित्रपटाचे निर्माते-दिग्दर्शक दीपक कदम  यांनी सांगितले. ‘२०१९ मध्ये माझा चित्रपट पूर्ण करून तो महोत्सवाला पाठवला होता, मात्र चित्रपटगृहात त्याचे प्रदर्शन होऊ न शकल्याने माझे ६७ लाख रुपये अडकले आहेत. आमच्यासाठी ही रक्कम खूप मोठी आहे, आमचे चित्रपट लहान खर्चाचे आहेत, असेही कदम म्हणाले. ‘हॅशटॅग प्रेम’ या चित्रपटाद्वारे पहिल्यांदाच चित्रपट निर्मितीत उतरलेल्या अनिल पाटील यांनी आता सावधपणे नियोजन करत जितका खर्च वसूल करता येईल तेवढे करणेच हातात असल्याचे सांगत निराशा व्यक्त केली.

विवंचना अशी…

दरवर्षी मराठीत शंभर ते सव्वाशे चित्रपटांची निर्मिती होते. गेल्यावर्षी किमान ५० ते ६० चित्रपट प्रदर्शनासाठी तयार होते. प्रत्येकाचा निर्मितीखर्च एक ते दोन कोटी किं वा त्यापेक्षा जास्त असतो. निर्मितीपासून प्रदर्शनापर्यंतचा खर्च लक्षात घेतला तर नुकसानीचा आकडा छातीत कळ आणणारा आहे. अशा परिस्थितीत निर्माते खचले आहेत, अशी माहिती चित्रपट वितरक समीर दीक्षित यांनी दिली. मराठीत छोट्या निर्मात्यांची संख्या जास्त आहे. टाळेबंदीमुळे ते आर्थिक विवंचनेत आहेत. आधीचे चित्रपट प्रदर्शित झाले नसल्याने अनेकांनी अन्य चित्रपटांचे चित्रीकरणही पुढे ढकलले आहे.