01 March 2021

News Flash

‘गल्फ सिने फेस्ट २०२१’ ची गगनभरारी; लवकरच होणार मराठी चित्रपटांचे प्रीमियर शो

मराठी सिनेमांची गरुडझेप

करोनामुळे ओढावलेल्या संकटाचा परिणाम सर्वच क्षेत्रांना बसला. या संकटातून कलाविश्वाचीदेखील सुटका झाली नाही. कलाविश्वावरही आर्थिक संकट कोसळलं. मात्र, या सगळ्या कटू आठवणी विसरुन मराठी चित्रपटसृष्टी पुढे मार्गस्थ झाली आहे. इतकंच नाही तर मराठीचा झेंडा सातासमुद्रापार फडकवण्यासाठी सज्जदेखील झाली आहे. त्यामुळे यंदा दुबईत ‘सिने फेस्ट २०२१’चे आयोजन करण्यात आलं असून नुकताच याचा एक छोटेखानी समारंभ पार पडला. या सोहळ्यात मराठीतील अनेक दिग्गज सेलिब्रिटी उपस्थित होते.

आखाती देशातील चित्रपटप्रेमींना आनंद देण्यासाठी तसेच मराठी चित्रपटसृष्टी नव्या ऊर्जेने आणि आत्मविश्वासाने सज्ज व्हावी या उद्देश्याने ‘सिने फेस्ट २०२१’ या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. तत्पूर्वी या सोहळ्याचे आयोजक असलेल्या ‘५ जी इंटरनॅशनल’ने नव्या वर्षाच्या स्वागतासाठी एका छोटेखानी समारंभाचे नुकतेच आयोजन केले होते.

मराठी चित्रपटाला ‘ग्लोबली कनेक्ट’ करण्याचा आयोजक सचिन कटारनवरे यांच्या प्रयत्नाला दाद देत त्यांच्या धाडसाचे कौतुक ज्येष्ठ निर्माता-दिग्दर्शक महेश कोठारे यांनी याप्रसंगी केले. ‘५ जी इंटरनॅशनल’च्या वतीने आयोजित ‘गल्फ सिने फेस्ट २०२१’ या सोहळ्यात काही निवडक बहुचर्चित आगामी मराठी चित्रपटांचे प्रीमियर शो संपन्न होणार आहेत. याखेरीज काही मराठी चित्रपटांच्या ट्रेलर्स, प्रोमोज आणि गाण्यांची झलकही सिनेचाहत्यांच्या आकर्षणाचे केंद्र ठरणार आहे. २०२१ या नव्या वर्षात सातासमुद्रापार रंगणारा हा सोहळा मराठी चित्रपटांसाठी कमालीचा उत्साहवर्धक ठरेल, असा आशावाद उपस्थित मान्यवरांनी यावेळी व्यक्त केला.

करोनाबाबतच्या आंतरराष्ट्रीय प्रवासासंदर्भातील नियमावलीमुळे २० ते २३ जानेवारी दरम्यान दुबईत रंगणाऱ्या या नियोजित सोहळ्याचे आयोजन शक्य नसल्याने पुढील तारखांची जुळवाजुळव सध्या सुरु असून लवकरच आयोजकांकडून त्याविषयीची पुढील माहिती कळविण्यात येणार आहे. नव्या वर्षाच्या स्वागतासाठी जमलेल्या या मान्यवर मंडळीनी आयोजक सचिन कटारनवरे यांच्या या अनोख्या कल्पनेला पाठिंबा दर्शवला. या सोहळ्याचे सूत्रसंचालन अभिनेत्री समीरा गुजर यांनी केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 12, 2021 4:07 pm

Web Title: marathi films gulf cine awards ssj 93
Next Stories
1 “तुम्ही मला लढण्याची प्रेरणा दिली”; कंगनाने मानले आपल्या गुरुचे आभार
2 ‘माझे बाबा हयात नाहीत पण…’, डॉक्टर डॉन मधील राधाची भावूक पोस्ट
3 ‘ही’ व्यक्ती ठेवणार विराट-अनुष्काच्या मुलीचं नाव
Just Now!
X