मुंबईमधील महागड्या भागांमध्ये अनेक कलाकारांनी कोट्यावधी रुपयांची घरं घेतल्याच्या बातम्या आपण अनेकदा ऐकतो. मात्र सध्या मराठी चित्रपटसृष्टीमधील एका जोडप्याने नुकतच वांद्र्यामध्ये कोट्यावधींचं घरं घेतली आहे. या जोडप्याने दोन घरं घेतली असून त्यांची एकत्रित किंमत साडे सतरा कोटी रुपये इतकी आहे.

रिअल इस्टेटमधील घडामोडींचे अभ्यासक, पत्रकार वरुण सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार मराठी चित्रपट सृष्टीमधील निर्माते श्रीकांत देसाई आणि त्यांची पत्नी मुग्धा देसाई यांनी दर्शन देसाईंच्या सोबत या महागड्या घरांची खरेदी केलीय. दर्शन प्रोडक्शन नावाचं प्रोडक्शन हाऊस असणाऱ्या देसाईंनी आतापर्यंत मराठीमध्ये अनेक चित्रपटांची निर्मिती केलीय. इंडेक्सटॅप डॉटकॉमने दिलेल्या माहितीनुसार हे दोन्ही फ्लॅट्स व्हाइट रोज नावाच्या इमारतीमध्ये असून ही इमारत वांद्रे पश्चिम येथील पेरी रोडवर आहे.

नक्की पाहा >> Home Alone: एक समुद्र… एक बेट… एकच घर…; जाणून घ्या ‘या’ सुंदर व रहस्यमयी घराबद्दल

कागदपत्रांमधून समोर आलेल्या माहितीनुसार हे फ्लॅट्स इमारतीच्या १७ व्या मजल्यावर आहेत. यापैकी फ्लॅट क्रमांक १७०१ ची किंमत ८ कोटी ८८ लाख ६७  हजार ५०० इतकी आहे तर त्याच्या बाजूच्या १७०२ साठीही इतकीच किंमत मोजण्यात आलीय. दोन्ही फ्लॅट्सची एकत्रित किंमत १७.५ कोटी इतकीय.

२४ मार्च २०२१ रोजी या संपत्तीची कागदोपत्री व्यवहार करण्यात आले तर नोंदणी १७ जून रोजी करण्यात आली आहे. प्रत्येक फ्लॅट हा १ हजार ७४४ स्वेअर फुटांचा असून दोन्ही फ्लॅट्सचा एकूण एरिया ३ हजार ४८८ स्वेअर फूट इतका आहे. प्रत्येक फ्लॅट्ससोबत दोन कार पार्किंग देण्यात आलेल्या आहेत. दर्शन प्रोडक्शनशी ईमेलवरुन या व्यवहारासंदर्भात चौकशी केली असता प्रोडक्शन हाऊसकडून रिप्लाय आला नाही.

देसाईंनी घेतलेल्या या फ्लॅट्सचा व्यवहार करताना ५३ लाख ३२ हजारांची स्टॅम्प ड्युटीची रक्कम देण्यात आली आहे. राज्य सरकारने जानेवारी २०२१ ते मार्च २०२१ दरम्यान स्टॅम्प ड्युटीवर दोन टक्क्यांची सवलत दिली होती. तीन मार्च २०२१ आधी स्टॅम्प ड्युटी भरल्यास नंतर विक्रीचा कररानामा करण्याची सवलत देण्यात आली होती.

नक्की पाहा >> गृहकर्जावर मोठी सूट; जाणून घ्या सर्वात स्वस्त Home Loan देणाऱ्या Top 10 बँका व त्यांचे व्याजदर

मागील वर्षी सप्टेंबर २०२० ते डिसेंबर २०२० दरम्यान स्टॅम्प ड्युटीमध्ये तीन टक्क्यांची सूट देण्यात आलेली. या कालावधीमध्ये अनेक बड्या कलाकारांची गुंतवणूक केल्याचं पहायला मिळालं. अभिनेता अजय देवगणने ४७ कोटी ५० लाखांचा बंगला याच कालावधीमध्ये विकत घेतला. अमिताभ बच्चन यांनी अंधेरीमधील एका उंच इमारतीमध्ये ड्युप्लेक्स फ्लॅटसाठी ३१ कोटी रुपये मोजले. याच कालावधीमध्ये डी मार्टचे राधाकृष्ण दमानी यांनी मलबार हिल्स येथे १००१ कोटींना बंगला विकत घेतला.