एक काळ असा होता की मुलं टीव्ही समोरुन हलायचीच नाहीत. टीव्हीच आपल्या मुलांचं आयुष्य खराब करणार अशी आई- वडिलांना खात्रीच होती. पण काळ बदलला तसं मनोरंजनाचं माध्यमही बदललं. सध्याची तरुणाई तासन् तास टीव्ही पाहण्यापेक्षा मोबाइलला खिळलेली असते. सोशल मीडिया हे एक मनोरंजनाचं उत्तम माध्यम झालं आहे. त्यातही यू-ट्यूब हे तर साऱ्यांचेच आवडीचे माध्यम झाले आहे. टीव्हीवरील मालिका पाहण्यापेक्षा यूट्यूबवर वेब सीरिज पाहणं त्यांना अधिक पसंत आहे. या मायाजाळात मराठी बरंच मागे असलं तरी, आपल्या भाषेतील अनेक चांगल्या संकल्पना यूट्यूबवर येत आहेत. आता ‘माइम थ्रू टाइम’ ही संकल्पनाच घ्या ना…

Bhagyashree Mote separated from vijay palande
मराठी अभिनेत्री भाग्यश्री मोटेचा साखरपुडा मोडला, पोस्ट शेअर करत म्हणाली, “मी आणि विजयने…”
What is Microsoft warning to India about China regarding AI
‘एआय’च्या माध्यमातून निवडणुकांमध्ये गोंधळ उडवणे शक्य? चीनबाबत मायक्रोसॉफ्टचा भारताला कोणता इशारा?
jun furniture poster
“या म्हाताऱ्याला अडवूनच दाखवा”; ‘जुनं फर्निचर’ मध्ये मराठी कलाकारांची मांदियाळी, पहिलं पोस्टर प्रदर्शित
The movie Swatantryaveer Savarkar Actor Randeep Hooda Marathi language
‘मराठी भाषेत भावभावनांचा ओलावा, सशक्तपणा..’

‘माइम थ्रू टाइम’ ही संकल्पना तशी जूनी असली तरी मराठीसाठी ती नवीनच आहे. आतापर्यंत हिंदी, पंजाबी, मल्याळी तेलगू, इंग्रजी अशा अनेक भाषांमधून या संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर करण्यात आले आहेत. ‘मुखवटे ए.सी.जे.एन’ या यूट्यूब चॅनलने ‘माईम थ्रू टाईम’ कार व्हिडिओ शेअर केला आहे. १७ मार्चला शेअर करण्यात आलेल्या या व्हिडिओला आतापर्यंत २० हजारांहून जास्त लोकांनी पाहिले आहे. या व्हिडिओमध्ये मराठी अभिनेत्री नम्रता गायकवाड, सेन्हा चव्हाण, चारु यांनी काम केले आहे. ५ मिनिटांच्या या व्हिडिओमध्ये या तिघी १७ वेगळ्या लूक्समध्ये दिसत आहेत. या व्हिडिओचे नृत्य दिग्दर्शन सागर जाधव याने केले असून दशरथ शेळके यांनी सिनेमॅटोग्राफी केली आहे.

‘माईम थ्रू टाईम’ कार व्हिडिओमध्ये ऐरणीच्या देवा तुला, झिंगाट डान्स, दुनियादारी, नवीन पोपट हा, लय भारी अशा मराठीतील गाजलेल्या १७ गाण्यांचा काही भाग घेण्यात आला आहे. या गाण्यावर कारमध्ये बसल्या जागी अभिनेत्रींनी नृत्य केले आहे. हा व्हिडिओ पाहिल्यावर मराठी कलाकारांचा हा पहिला प्रयत्न सगळ्यांना नक्कीच आवडेल यात काही शंका नाही.