News Flash

‘हा ही बलात्काराएवढाच मोठा गुन्हा आहे’; ‘तो’ फोटो पाहून हेमांगी कवी संतापली

मानवतेस काळिमा फासणाऱ्या हाथरसमधील सामूहिक बलात्काराच्या घटनेचे देशभर तीव्र पडसाद उमटले.

मानवतेस काळिमा फासणाऱ्या हाथरसमधील सामूहिक बलात्काराच्या घटनेचे देशभर तीव्र पडसाद उमटले. विरोधकांनी उत्तर प्रदेश सरकारला धारेवर धरले असून, याच पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते राहुल गांधी व प्रियंका गांधी पीडितच्या कुटुंबाची भेट घेण्यासाठी हाथरसकडे रवाना झाले होते. त्यावेळी गर्दीतील एक फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत अभिनेत्री हेमांगी कवीने संताप व्यक्त केला.

या फोटोमध्ये एक पोलीस अधिकारी प्रियंका गांधी यांचा हात पकडताना दिसत आहे. ‘नुसतं सोशल मीडियावर येऊन बोलू नका मॅडम. बाहेर पडा म्हणणाऱ्यांनो, चॅलेंज करणाऱ्यांनो हे पाहा. आहे का सुरक्षित? कसे वाटतायत ते हात तिच्यावर? हा ही बलात्काराएवढाच मोठा गुन्हा आहे. मूळ समस्या कुठेय कळतंय का?’, असा सवाल हेमांगीने या पोस्टमधून केला.

“आता यात ही, हा कुणाचा फोटो? प्रियंका गांधी की जियंका गांधी, कुठल्या पक्षाची, आताच कशी बाहेर आली? यात गुंतवून मूळ समस्या बाजूला ठेवूया. काय?”, अशी उपरोधिक टीकाही तिने केली.

हाथरस येथे घडलेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणावरून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. उत्तर प्रदेश सरकारवर यावरून सर्वस्तरातून टीका होत असताना, आता मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी हाथरस येथील घटनेची सीबीआय चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 4, 2020 4:14 pm

Web Title: marathi hemangi kavi dhumal expressed anger over a police grabbing priyanka gandhi while protest ssv 92
Next Stories
1 देवा आणि डॉ मोनिकाच्या प्रेमामध्ये सुरु झाली अडथळ्याची शर्यत
2 सुष्मिताच्या मुलीचे बॉलिवूडमध्ये पदार्पण, करणार ‘या’ चित्रपटामध्ये काम
3 कौतुकास्पद! सोनू सूदने ऑनलाइन अभ्यासातील अडचण दूर करण्यासाठी गावात बसवला मोबाईल टॉवर
Just Now!
X