‘होय महाराजा, होय महाराजा’ असं म्हणत अस्सल मालवणी बाज असलेली गाव गाता गजाली ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. पहिल्याच आठवड्यात या मालिकेने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं असून कित्येकजण तर, या मालिकेतील पात्रांमध्ये स्वत:च्या ओळखीच्या व्यक्तींना शोधण्यात गुंग आहेत या मालिकेतील ‘वामन्या’, ‘मास्तर’, ‘बैल’ या सर्व पात्रांच्या साथीने प्रेक्षकांमध्येही गजाल्या रंगू लागल्या आहेत. अशा या मालिकेच्या टायटल साँगचं एक नवं व्हर्जन सध्या सोशल मीडियावर अनेकांनी शेअर केलं आहे.

नागेश मोरवेकर यांनी या मालकेच्या मुळ शीर्षक गीताला आवाज दिला आहे. झी मराठीच्या फेसबुक पेजवर या गाण्याच्या रेकॉर्डिंगचा व्हिडिओसुद्धा प्रदर्शित करण्यात आला होता. वेगळ्याच शैलीत आणि अस्सल मालवणी भाषेत असलेल्या या गाण्याला अल्पावधीतच लोकप्रियता मिळाली. अशा या सुरेख गाण्याचं एक नवं व्हर्जन सध्या अनेकांचं लक्ष वेधत आहे. ‘चिल आऊट मिम्स’च्या फेसबुक पेजवरुन हा गजालीच्या या विदेशी व्हर्जनचा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये मोठ्या कलात्कमपणे दृश्यांचं मिश्रण करण्यात आलं असून, गाण्यातील शब्दांना ही दृश्यं हुबेहुब जुळत आहेत. मुख्य म्हणजे हा व्हिडिओ पाहताना ‘आता परदेशी कलाकारही गाता गजाली’, असंच अनेकजण म्हणत आहेत.

jaguar land rover
लवकरच जग्वार लँड रोव्हरचे भारतात उत्पादन; टाटा मोटर्सचे नियोजन; तमिळनाडूमध्ये उभारणार १ अब्ज डॉलरचा प्रकल्प
iral Video Shows Woman Police Officer Dancing On Railway Station
रेल्वे स्टेशनवर पोलिसांच्या गणवेशात नाचणाऱ्या तरुणीचा Video Viral! नेटकऱ्यांनी केलं ट्रोल
Yamaha introduces vibrant new color options across the MT15 V2 Fascino and Ray ZR portfolios Know Features And price
ब्लूटूथ कनेक्टिव्हिटीसह यामाहा इंडियाने ‘या’ दुचाकींना केलं उपडेट; पाहा कलर ऑप्शन…
spmcil recruitment 2024 jobs in security printing and minting corporation of India ltd
नोकरीची तयारी : सिक्युरिटी प्रिंटिंग प्रेसमधील संधी

वाचा : कमल हसनच्या ‘अप्पूराजा’तील ‘अप्पू’ साकारण्यासाठी करण्यात आल्या होत्या या करामती

‘चिल आऊट मिम्स’च्या पेजवर पोस्ट करण्यात आलेला हा व्हिडिओ अनेकांनी शेअर केला आहे. दरम्यान, मालवणातील गजालीची धम्माल या मालिकेतून पाहायला मिळत आहे. प्रसिद्ध विनोदी अभिनेता दिगंबर नाईक, भरत सावले, किशोर रावराणे आणि इतर कलाकारांच्या साथीने ‘गाव गाता गजाली’ प्रेक्षकांची मनं जिंकत आहे. कोणत्याही भूमिकेला उगाचच न रंगवता सहजपणे होणारे शाब्दीक विनोद, सर्वसामान्य गावकऱ्यांच्या चर्चा, त्यांच्या रोजच्या आयुष्यात घडणारे प्रसंग या सर्व गोष्टींवर या मालिकेतून प्रकाश टाकण्यात आला आहे.