News Flash

नेमकं काय आहे ‘८ दोन ७५’चं रहस्य?; उत्सुकता वाढवणारा टीझर प्रदर्शित

पाहा, '८ दोन ७५'चा टीझर

नेमकं काय आहे ‘८ दोन ७५’चं रहस्य?; उत्सुकता वाढवणारा टीझर प्रदर्शित

अनेक चित्रपट तगडी स्टारकास्ट किंवा कथानकामुळे चर्चेत येत असतात. मात्र, सध्या एक चित्रपट त्याच्या नावामुळे चर्चेत आला आहे. उदाहरणार्थ या निर्मितसंस्थेअंतर्गत तयार करण्यात आलेला ‘८ दोन ७५’ हा चित्रपट सोशल मीडियावर चांगलाच चर्चेचा विषय ठरत आहे. या चित्रपटाचं नाव जाहीर झाल्यापासून त्याविषयी प्रेक्षकांमध्ये चांगलीच उत्सुकता निर्माण झाली आहे. यामध्येच या चित्रपटाचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

प्रदर्शित झालेल्या टीझरवरुन हा चित्रपट राजकीय विषयावर भाष्य करणारा असल्याचं दिसून येत आहे. टीझरच्या सुरुवातीलाच संस्कृती बालगुडे आणि शुभंकर तावडे ही जोडी पाहायला मिळते. त्यानंतर, अचानक एका वळणावर या कथानकात राजकीय घटना घडताना दिसतात. त्यामुळे या चित्रपटाच्या कथेत नेमकं काय रहस्य आहे? हे चित्रपट पाहिल्यानंतरच प्रेक्षकांना सारी गणित उलगडणार आहेत.

आणखी वाचा- ‘बिग बॉस’फेम अली गोनी- जास्मीन भसीन बांधणार लग्नगाठ?

दरम्यान, संजय मोने, आनंद इंगळे, विजय पटवर्धन, चिन्मय संत, डॉ .निखिल राजशिर्के, शुभंकर तावडे, संस्कृती बालगुडे, शर्वाणी पिल्लई अशी दमदार स्टारकास्ट या चित्रपटात झळकणार आहे. तर अभिनेता पुष्कर श्रोत्री हा पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेतून आपल्या भेटीस येणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 24, 2021 12:33 pm

Web Title: marathi movie 8 don 75 fakt icchashakti havi teaser out ssj 93
Next Stories
1 ‘गंगूबाई काठियावाडी’चं नवं पोस्टर, आलिया भट्टने शेअर केला लूक
2 शिल्पा शेट्टी देखील करते ‘पावरी’, पतीसोबत शेअर केला मजेशीर व्हिडीओ
3 ‘फँड्री’च्या शालूचा पावरी मूड, सोशल मीडियावर राजेश्वररीचा धुमाकूळ
Just Now!
X