धडाडी, कर्तृत्ववान अशा स्त्रियांचा गौरव सतत होताना दिसतो, मात्र यामागे असणारे अथक परिश्रम, कष्ट, जिद्द, चिकाटी, मेहनत याची जाणीव मात्र दूर दूर पर्यंत नसते. आज आपल्या जगात पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून स्त्रियाही पुढे सरसावल्या आहेत असे आपण वेळोवेळी म्हणतो. डॉक्टर, पोलीस अधिकारी, इंजिनिअर, शास्त्रज्ञ अशा बड्या जागांवर आज आपण महिलांना पाहतो आणि खरंच ही कर्तृत्वाची बाब आहे. अशाच एका कर्तृत्ववान महिला कॉन्स्टेबल ते आयपीएस पोलीस अधिकारी असा प्रवास करणाऱ्या अहिल्या पाटील यांचा ‘अहिल्या’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येण्यास सज्ज झाला आहे.
जगात बदल घडवून आणायचे असतील तर सर्वप्रथम आपण आपल्यात बदल घडवायला हवा, जगात बदल घडवून आणण्यासाठी स्वतःपासून सुरुवात करायला हवी असा महत्वपूर्ण संदेश देणारा ‘अहिल्या’ हा चित्रपट आहे. आर्थिक परिस्थिती वर मात करत पोलीस दलात भरती होऊन आयपीएस बनण्याचे स्वप्न उराशी बाळगणाऱ्या अहिल्याचा संपूर्ण प्रवास आणि त्या प्रवासात तिने दाखवलेले धडाडीचे कृत्य याचा उत्तम समतोल राखण्यात आला आहे.

Bhavesh Bhandari and his wife Jinal
Video: रथातून मिरवणूक, मौल्यवान वस्तू फेकल्या; जैन भिक्षूक होण्यासाठी २०० कोटी केले दान
Concerned about the security of Indians in Iranian custody
जहाजावरील कर्मचाऱ्यांचे कुटुंबीय चिंतेत; इराणच्या ताब्यातील भारतीयांच्या सुरक्षेची चिंता
in Pune Unborn Child Dies as Pregnant Woman Beaten by a neighbor One Arrested
पुणे : शेजाऱ्याने केलेल्या मारहाणीत गर्भवती महिलेच्या पोटातील अर्भकाचा मृत्यू
Abigail Lupi
फेनम स्टोरी: केअर गर्ल अबिगेल

अन्यायाशी आणि सत्यासाठी सुरू असलेला अहिल्येचा लढा आणि याच लढ्यातून तिच्या मनात निर्माण झालेली ध्येयपूर्ती पूर्ण होईल का? तिच्या समोर असलेली आव्हाने ती कशी स्वीकारेल? त्यावर कसा विजय मिळवेल? अशा पडलेल्या प्रश्नांची उत्तरे चित्रपट पाहिल्यावरच पूर्ण होईल. आणि या प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी आपल्याला चित्रपटगृहात जाऊन हा चित्रपट पहावाच लागेल.

वाचा : Photo : 52 व्या वयातही ब्युटीफुल वर्षा!

दरम्यान, या चित्रपटात अभिनेत्री प्रीतम कागणे ही अहिल्या कागणे यांच्या रुपात झळकणार आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन आणि कथालेखन राजू पार्सेकर यांनी केलं आहे. तर निर्मिती अमोल कागणे, अमृता देवधर आणि अनघा खैर यांनी केली आहे. प्रीतमशिवाय या चित्रपटात प्रिया बेर्डे, रोहित सावंत, अमोल कागणे, प्रमोद पवार, निशा परुळेकर, नूतन जयंत, सौरभ पोंक्षे, मिलिंद ओक, श्रीधर चारी, सुभाष शिंदे, मधूकर सातपुते, कैलाश सोनावणे, जोया खान, संध्या माणिक, दिव्या शिंदे आदी कलाकारांच्या महत्वपूर्ण भूमिका आहेत. मेहनत आणि आत्मविश्वासाच्या बळावर आयपीएस पोलीस अधिकारी झालेल्या महत्वाकांक्षी अशा ‘अहिल्या’ची अभिमानास्पद गोष्ट २९ मे २०२० ला प्रेक्षकांना मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे.