News Flash

‘माझ्या बायकोचा प्रियकर’ सिनेमाचा टीझर प्रदर्शित

टीझरमध्ये तीनही व्यक्तिरेखांची झलक दाखवण्यात आली

सिनेमाच्या नावावरुन सिनेमाची कथा काही तरी वेगळी असल्याचे लक्षात येते. अनिकेत विश्वासराव, प्रियदर्शन जाधव आणि भाग्यश्री मोटे यांची मुख्य भूमिका असलेला माझ्या बायकोचा प्रियकर सिनेमाचा टीझर नुकताच प्रदर्शित करण्यात आला. या टीझरमध्ये तीनही व्यक्तिरेखांची छोटीशी झलक दाखवण्यात आली आहे.

राजीव एस रूईया दिग्दर्शित आणि राजकला मूवीज व बाबा मोशन पिक्चर्सच्या बॅनरअंतर्गत या सिनेमाची निर्मिती करण्यात आली आहे. ‘माझ्या बायकोचा प्रियकर’ सिनेमाच्या नावातच कथा लपलेली आहे. विनोदी व कौटुंबिक पार्श्वभूमीवर कथा आधारित असल्यामुळे प्रेक्षकांचे चांगले मनोरंजन होईल अशी सिनेमाच्या टीमची अपेक्षा आहे. प्रियदर्शन, अनिकेत आणि भाग्यश्री व्यतिरिक्त या सिनेमात अंशुमन विचारे, प्रिया गमरे, भारत गणेशपुरे, अनुपमा ताकमोगे, पदम सिंग या कलाकारांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. सिनेमात एकूण चार गाणी असून सिनेमाचे अधिकतर चित्रीकरण भोर आणि मुंबई परिसरात पार पडलं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 18, 2018 5:40 pm

Web Title: marathi movie aniket vishwasrao priyadarshan jadhav upcoming marathi movie majha baykocha priyakar
Next Stories
1 …म्हणून रणवीर दीपिकाच्या प्रेमात
2 ६१ व्या वर्षी या अभिनेत्याने घटवले २५ किलो वजन
3 काम मिळवण्यासाठी लोकांचे फोन नंबर चोरायचा रणवीर सिंग
Just Now!
X