News Flash

बुसान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात मराठीचा ‘अरुणोदय’!

लेखक-दिग्दर्शक पार्थो सेनगुप्ता यांच्या ‘अरुणोदय’ या मराठी चित्रपटाची निवड १९ व्या बुसान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी झाली आहे. महोत्सवातील ‘न्यू करंट्स’ आंतरराष्ट्रीय स्पर्धा विभागात निवड करण्यात

| September 4, 2014 06:38 am

लेखक-दिग्दर्शक पार्थो सेनगुप्ता यांच्या ‘अरुणोदय’ या मराठी चित्रपटाची निवड १९ व्या बुसान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी झाली आहे. महोत्सवातील ‘न्यू करंट्स’ आंतरराष्ट्रीय स्पर्धा विभागात निवड करण्यात आलेल्या १२ चित्रपटात याचा समावेश आहे. भारत आणि फ्रान्स यांच्यात चित्रपट निर्मितीबाबत झालेल्या कराराअंतर्गत तयार झालेला हा पहिलाच मराठी चित्रपट आहे. महोत्सवात या विभागातील सर्व चित्रपटांचे जागतिक किंवा आंतरराष्ट्रीय पातळीवरील हे पहिलेच खेळ असणार आहेत. गेल्या वर्षी दोन लाखांहून अधिक प्रेक्षकांनी या महोत्सवाला हजेरी लावली होती. आशियातील सर्वात महत्त्वाचा फिल्म बाजार असलेल्या ‘एशियन फिल्म मार्केट’चे यजमानपदही या महोत्सवाकडे आहे.
हरविलेली मुले मिळाली नाहीत तर या मुलांच्या पालकांना आयुष्यभर हे दु:ख सोसावे लागते. आपला मुलगा /मुलगी कधी ना कधी सापडेल, या आशेवर ते जगत असतात. ‘अरुणोदय’ या चित्रपटात अशाच एका असहाय्य पित्याचा मानसिक संघर्ष/ताण तणाव मांडण्यात आला आहे.
राष्ट्रीय नाटय़ विद्यालयाचा विद्यार्थी आदिल हुसेन, तनिष्ठा चॅटर्जी, ईशा अमलानी, चिन्मय कांबळी, गुलनाझ अन्सारी आणि ज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर हे कलाकार चित्रपटात आहेत. ऑक्टोबरच्या पहिल्या आठवडय़ात दक्षिण कोरियातील बुसान येथे होणाऱ्या चित्रपटाच्या पहिल्या खेळाला आदिल हुसेन, पार्थो सेनगुप्ता, निर्माते राकेश मेहरा, फ्रेंच निर्माते मार्क इर्मर हे उपस्थित राहणार आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 4, 2014 6:38 am

Web Title: marathi movie arunoday selected for busan international film festival
टॅग : Marathi Movie
Next Stories
1 अमृता दासगुप्ता बॉलीवूड पदार्पणास सज्ज
2 या पाच कारणांसाठी पाहा प्रियांकाचा ‘मेरी कोम’!
3 वेळेचे नियोजन करणे काही ‘रॉकेट सायन्स’ नाही- अक्षय कुमार
Just Now!
X