06 March 2021

News Flash

सखी-सिद्धार्थचा ‘बेफाम’ स्वॅग; पाहा व्हिडीओ

पाहा, 'बेफाम'चा ट्रेलर

गेल्या काही दिवसांपासून मराठी कलाविश्वात ‘बेफाम’ या एकाच चित्रपटाची चर्चा रंगली आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून अभिनेता सिद्धार्थ चांदेकर आणि सखी गोखले पहिल्यांदाच स्क्रीन शेअर करणार आहे. त्यामुळे हा चित्रपट चर्चेचा विषय ठरत आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे.

काही दिवसांपूर्वी ‘बेफाम’चं पहिलं पोस्टर प्रदर्शित झालं होतं. हे पोस्टर अनेकांची उत्सुकता वाढविणारं होतं. या पोस्टरमध्ये चित्रपटातील नायकाचा पाठमोरा फोटो होता. त्यामुळे या चित्रपटात मुख्य भूमिका कोण साकारणार याकडे प्रेक्षकांच लक्ष वेधलं होतं. त्यानंतर आता प्रदर्शित झालेल्या ट्रेलरमधून चित्रपटातील मुख्य कलाकारांवरील पडदा दूर झाला आहे.

प्रदर्शित झालेल्या ट्रेलरमधून सखी आणि सिद्धार्थ एका आरजेच्या रुपात पाहायला मिळत आहेत. मात्र, स्वप्न पूर्ण करण्यासाठी सिद्धार्थ त्याच्या आरजेच्या नोकरीचा त्याग करतो आणि स्वप्नांच्या मागे धावायचा प्रयत्न करतो. यात त्याला अनेक चढउतार येत असल्याचं दिसून येत आहे.

दरम्यान, या चित्रपटाचं दिग्दर्शन कृष्णा कांबळे करत असून अमोल कागणे या चित्रपटाची निर्मिती करत आहेत. या चित्रपटात अभिनेता सिद्धार्थ आणि सखीसोबत विद्याधर जोशी, शशांक शेंडे, कमलेश सावंत,महादेव अभ्यंकर,सीमा देशमुख महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकणार आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 17, 2021 3:53 pm

Web Title: marathi movie befam trailer out ssj 93
Next Stories
1 प्लास्टिक सर्जरीमुळे प्रियांकाला गमवावे लागले होते दोन चित्रपट
2 कौतुकास्पद! महिला पुजाऱ्याने बांधली दियाची लग्नगाठ
3 ‘फँड्री’तील शालूचा जलवा, सोशल मीडियावर राजश्रीची हवा
Just Now!
X