21 April 2019

News Flash

Video : ‘पु.लं’च्या जीवनावर आधारित चित्रपटाचा टीझर प्रदर्शित

महेश मांजरेकर यांच्या ‘फाळकेज् फॅक्टरी’ या निर्मिती संस्थेअंतर्गंत चित्रपटाची निर्मिती करण्यात येत आहे.

‘भाई.. व्यक्ती की वल्ली’

लेखक, गीतकार, संगीतकार, गायक, दिग्दर्शक, अभिनेते असं अष्टपैलू व्यक्तिमत्व असणारे पु. ल. देशपांडे हे खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचे भूषण होते. आजवर त्यांच्या साहित्यकृतींवर अनेक चित्रपट,नाटकं प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. परंतु आता खुद्द पुलंच्या जीवनावर आधारित चित्रपटाची निर्मिती दिग्दर्शक महेश मांजरेकर करत असून या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला आहे.

महेश मांजरेकर यांच्या ‘फाळकेज् फॅक्टरी’ या निर्मिती संस्थेअंतर्गंत ‘भाई.. व्यक्ती की वल्ली’ या चित्रपटाची निर्मिती करण्यात येत आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून भाईंच्या जीवनातील महत्वपूर्ण घटनांवर प्रकाश टाकण्यात येणार आहे.

दरम्यान, या चित्रपटामध्ये पु. ल. देशपांडे, सुनीताबाई देशपांडे यांच्याबरोबरच जवाहरलाल नेहरू, बाळासाहेब ठाकरे, बाबा आमटे, भीमसेन जोशी, दुर्गा भागवत, वसंतराव देशपांडे, कुमार गंधर्व अशा अनेक व्यक्तिमत्त्वांचा समावेश आहे. विशेष म्हणजे ‘हंटर’, ‘वायझेड’ चित्रपटामध्ये झळकलेला सागर देशमुख पु.ल.देशपांडे यांची भूमिका साकारणार आहे. तर इरावती हर्षेने सुनिताबाईंची भूमिका साकारली आहे. हा चित्रपट पुढील वर्षी ४ जानेवारी २०१९ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

 

First Published on November 8, 2018 1:43 pm

Web Title: marathi movie bhai vyakti ki valli teaser release